वाशिम: अवैध बांधकाम केल्याप्रकरणी वाशिम नगरपरिषदेच्या चार नगरसेवकांना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी ४ मे रोजी अपात्र ठरविले.जिल्हाधिकार्यांच्या आदेशामुळे नगरपरिषदेत खळबळ उडाली आहे. अश्विनी पत्की, उर्मिला पोटफोडे, हरीश सारडा व मोतीराम तुपसांडे या चार नगरसेवकांना अवैध बांधकामप्रकरणी अपात्र ठरविण्यात आले आहे. ही कारवाई महाराष्ट्र नगर परिषद आणि औद्योगिक नागरी नियम १९६५ चे कलम ४४ (१)(३) प्रमाणे महाराष्ट्र व नगर पंचायत प्रादेशिक नगर रचना या अधिनियमातील तरतुदीचा भंग केल्याप्रकरणी करण्यात आली.
वाशिमचे चार नगरसेवक अपात्र
By admin | Updated: May 5, 2016 03:19 IST