शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

नाट्यगृहासाठी ३८ लाखांचा निधी

By admin | Updated: June 30, 2017 01:21 IST

अधिकाऱ्यांची माहिती : वाशिम येथील इमारतीच्या कामाला येणार वेग

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हा मुख्यालयी नाट्यगृह उभारण्यासाठी अंतिम टप्प्याचे अर्थसहाय्य म्हणून राज्य शासनाकडून ३८ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. वाशिम शहरातील अकोला नाका परिसरात नाट्यगृहाच्या भव्य इमारतीचे बांधकाम या निधीतून पूर्ण करण्यात येणार आहे. सदर माहिती वाशिम नगर परिषदेच्या संबंधित विभागाकडून गुरुवारी प्राप्त झाली.वाशिम हे जिल्हा मुख्यालय असल्याने या ठिकाणी कलारसिक आणि नाट्यप्रेमींसह कलावंतांच्या सोयीसाठी नाट्यगृह उभारण्याची मागणी होती. स्थानिक नगर परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन विभागाच्यावतीने शासनाकडे या संदर्भात पाठपुरावा करण्यात आल्यानंतर या ठिकाणी नाट्यगृह उभारणीस मंजूरी देण्यात आली. एकूण ९ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असलेले हे नाट्यगृह नगर परिषदेने स्वत: काही रक्कम गुंतविण्यासह शासनाच्या निधीने उभारण्याचे निश्चित झाले. यासाठी शासनाकडून नगर परिषदेला चार कोटी रुपये निधी मंजूरही करण्यात आला. त्यानंतर शहरातील अकोला नाका परिसरात नाट्यगृहाच्या भव्य इमारतीचे बांधकाम मागील वर्षांपासूनच सुरू झाले. यात शासनाकडून मंजूर निधीतील तिसऱ्या आणि अंतिम टप्प्याचा निधी म्हणून ३८ लाख रुपयांचा निधी प्राप्त होणे बाकी होते. त्यासाठी शासनाकडे नगर परिषदेच्यावतीने पाठपुरावा करण्यात आल्यानंतर राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या ३१ डिसेंबर २०१६ रोजीच्या निर्णयाद्वारे वाशिम येथे नाट्यगृह उभारण्यासाठी तिसऱ्या व अंतिम टप्प्यातील ३८ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला होता. या निधीच्या खर्चाबद्दल शासनाकडून अहवाल आणि माहितीही मागविण्यात आली; परंतु सदर निधी वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयास तोपर्यंत प्राप्त झाला नसल्याने सदर निधी आहरीत करता आला नसल्याचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन कक्षाकडून पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाला पाठविण्यात आले. त्या पत्रानुसार ३१ डिसेंबर २०१६ चा निर्णय रद्द करून वर्ष २०१७-१८ मध्ये सदर नाट्यगृहास तिसऱ्या व अंतिम टप्प्यातील हप्त्यापोटी २८ जूनच्या सुधारित निर्णयाद्वारे ३८ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली. या निधीच्या वापरासाठी शासनाच्या ७ नोव्हेंबर २०१२ च्या निर्णयातील अटी व शर्तींचे पालन करणे वाशिम नगर परिषद आणि वाशिम जिल्हाधिकाऱ्यांना बंधनकारक राहणार आहे. दरम्यान, नाट्यगृहाच्या बांधकामासंदर्भात वाशिम नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनीही १५ मे २०१७ रोजी शासनाकडे पत्रव्यवहार केला होता. आता या नाट्यगृहाच्या बांधकामासाठी तिसऱ्या व अंतिम टप्प्यातील निधी वितरित करण्यास मान्यता मिळाल्याने नाट्यगृह इमारतीच्या कामाला वेग मिळणार आहे. वाशिम शहरात नाट्यगृह उभारणीसाठी विविध संघटना, कलावंत, नाट्यप्रेमींनी वरिष्ठांकडे पाठपुरावा केला होता. याला प्रशासनाचे योग्य सहकार्य मिळाल्याने नाट्यगृहाचा प्रश्न निकाली निघाला होता. नाट्यगृहासाठी भरीव निधी प्राप्त झाल्यानंतर आता अंतिम टप्प्याचे अर्थसहाय्य म्हणून राज्य शासनाने ३८ लाखांचा निधी मंजूर केला.