दादाराव गायकवाड / कारंजा लाड
विविध संकटांचा सामना करणार्या बळीराजाला वन्यप्राण्यांनीही चांगलेच हैराण केले आहे. मंगरुळपीर, मानोरा, कारंजा या तीन तालुक्यात हरीण, काळविट, रानडुक्कर, नीलगाय माकडे आदि प्राण्यांनी केलेल्या पीक नुकसानीपोटी शासनाकडून सन २0१४ मध्ये शेतकर्यांनी वन विभागाकडे आजवर सादर केलेल्या प्रस्तावांपैेकी ३३२ प्रकरणे विविध कारणांमुळे प्रलंबित आहेत. मंगरुळपीर, मानोरा आणि कारंजा या तिन तालुक्यात जंगलाचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात आहे. कारंजा तालुक्यात मोठय़ा प्रमाणात काळविटांची संख्या मोठय़ा प्रमाणात असून, येथे असलेले कारंजा-सोहोळ अभयारण्य त्याची पुष्टी करते. यंदाच्या वर्षात वाशिम जिल्हय़ातील कारंजा, मानोरा, मंगरुळपीर तालुक्यात मोठय़ा प्रमाणात शेतकर्यांना वन्यप्राण्यांचा फटका बसला. वन्यप्राण्यांकडून झालेल्या पिक नुकसानीचा मोबदला मिळावा म्हणून वनविभागाकडे आजवर या तीन तालुक्यातून एकूण ५७९ प्रस्ताव पाठविण्यात आले आहेते.त्यापैकी केवळ १३५ प्रस्ताव मंजूर झाले, तर १0३ प्रस्ताव नियमांत बसत नसल्यामुळे फेटाळण्यात आले किंवा रद्द क रण्यात आले, तर एकूण ३४१ प्रस्ताव विविध कारणांमुळे अद्यापही प्रलंबित आहेत. मानोरा तालुक्यात ूनसर्वाधिक २८0 प्रस्ताव सादर करण्यात आले. त्यापैकी ६२ मंजूर, तर ३२ नामंजूर करण्यात आले. त्या खालोखाल कारंजा तालुक्यातून १५१ प्रस्ताव सादर करण्यात आले. त्यापैकी ४८ मंजूर झाले, तर १६ फेटाळण्यात आले. मंगरुळपीर तालुक्यातून सादर करण्यात आलेल्या १४८ प्रस्तावांपैकी २५ मंजूर, तर ५५ नामंजूर करण्यात आले. शेतकर्याकडून बरेचदा पाठविण्यात आलेल्या प्रस्तावांत त्रुटी असल्यामुळे हे प्रस्ताव प्रंलबीत राहतात. एंकदरीत स्थिती पाहता. विविध संकटांचा सामना करणार्या शेतकर्यांना त्यांच्या नुकसानीचे विविध पुरावे सादर करावे लागतात आणि ते करूनही त्यांना आवश्यक त्या प्रमाणात मोबदला मिळत नाही. ही खेदाचीच बाब म्हणावी लागेल.