शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

३३ हजार कुटुंबियांशी प्रशासनाने साधला ‘संवाद’!

By admin | Updated: October 4, 2016 02:51 IST

‘भेटी-गाठी स्वच्छतेसाठी’ अभियानाचा समारोप ; प्रसार-प्रसिद्धीसाठीची चार वाहने झाली बंद.

वाशिम, दि. 3- स्वच्छ भारत मिशनअंतर्गत 'भेटी-गाठी स्वच्छतेसाठी' या उपक्रमाच्या शेवटच्या दिवसापर्यंत वाशिम जिल्ह्यात शौचालय नसलेल्या ३२ हजार ७८८ कुटुंबियांशी अधिकारी व पदाधिकार्‍यांनी संवाद साधला. राज्यशासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने २२ ऑगस्ट ते २ ऑक्टोबरदरम्यान स्वच्छ महाराष्ट्रासाठी १८ लाख गृहभेटी, हा आगळावेगळा उपक्रम राबविला. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यात शौचालय नसलेल्या ३0 हजार कुटुंबांना भेटी देऊन शौचालयाचे महत्व पटवून देण्याचे उद्दिष्ट वाशिम जिल्हा परिषदेने निश्‍चित केले होते. २२ ऑगस्ट ते २ ऑक्टोबर दरम्यान अधिकारी व पदाधिकार्‍यांनी गावोगावी जाऊन शौचालय नसलेल्या ३२ हजार ७८८ कुटुंबियांच्या भेटी घेऊन शौचालयाचे महत्त्व पटवून दिले. दरम्यान, मध्यंतरी जिल्हा स्वच्छता कक्षाकडे प्रचार-प्रसिद्धीसाठी केवळ एकच वाहन असल्याने या अभियानाची गती मंदावली होती. यासंदर्भात ह्यलोकमतह्णने वृत्त प्रकाशित करून वरिष्ठांचे लक्ष वेधल्यानंतर चार वाहने मिळाली. त्यामुळे प्रचार-प्रसिद्धीला वेग आला. आता २ ऑक्टोबरला या अभियानाचा समारोप झाल्याने ही चार वाहनेदेखील बंद करण्यात आली. त्यामुळे पुन्हा अभियानाची गती मंदावण्याची शक्यता नाकारता येत नाही.२२ ऑगस्ट ते २ ऑक्टोबर दरम्यान अधिकारी व पदाधिकार्‍यांनी गावोगावी जाऊन शौचालय नसलेल्या कुटुंबियांकडे शौचालय बांधकामाचा आग्रह धरला. या अभियानादरम्यान जवळपास १८00 शौचालयांचे बांधकाम सुरू झाले. सन २0१६-१७ या वर्षात जिल्ह्यात ३५ हजार ८६५ शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट निश्‍चित केले आहे. वाशिम तालुक्यात ४0७६, मालेगाव तालुक्यात ४१३७, रिसोड तालुक्यात ४१४१, मंगरुळपीर तालुक्यात ५८८७, मानोरा ७९९६ व कारंजा तालुक्यात सर्वाधिक ९६२८ शौचालय बांधकामाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. हगणदरीमुक्त गाव मोहिमेत दिरंगाई करणार्‍या अधिकारी- कर्मचार्‍यांविरूद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख व मुख्य कार्यकारी अधिकार गणेश पाटील यांनी दिले आहेत. १२ हजार रुपयांचे अनुदान संबंधित पात्र लाभार्थीं देण्यात दिरंगाई झाली तर शिस्तभंगाची कारवाईदेखील केली जाणार आहे. यामुळे कामचुकार कर्मचार्‍यांचे धाबे दणाणले आहेत. ह्यभेटी गाठी - स्वच्छतेसाठीह्ण या अभियानादरम्यान जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा दिलीप देशमुख, उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी ग्रामस्थांच्या दारी पोहोचले. परिणामी, गृहभेटी संवाद अभियानांतर्गतची उद्दिष्टपूर्ती झाली. आता चार वाहने बंद करण्यात आल्याने अभियानावर विपरित परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.