जिल्ह्यात लघू पाटबंधारेअंतर्गत १३७ प्रकल्प आहेत. यातील बहुतांश प्रकल्पांवर शेतकऱ्यांचे सिंचन अवलंबून आहे. यंदाच्या पावसाळ्यात जुलैच्या सुरुवातीपर्यंतही अपेक्षित पाऊस न पडल्याने प्रकल्पांची स्थिती गंभीर झाली होती. तथापि, १० जुलैपासून पावसाने जिल्ह्यात धडाकाच सुरू केला आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान झाले. परंतु, या पावसामुळे प्रकल्पांच्या पातळीला मात्र मोठा आधार मिळाला असून, जिल्ह्यातील ३३ लघुप्रकल्प १०० टक्के भरले आहेत. यामुळे संबंधित प्रकल्पाच्या क्षेत्रातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
--------------
एकबुर्जी प्रकल्पात ९२ टक्के साठा
जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पात समाविष्ट असलेल्या वाशिम तालुक्यातील एकबुर्जी प्रकल्पात ९२ टक्क्यांवर जलसाठा झाला आहे. या प्रकल्पाची पातळी वाढल्यामुळे वाशिम शहराच्या पाणीपुरवठ्याची समस्या मिटली आहे.
------------------
मानोऱ्यातील १३ प्रकल्प ‘ओव्हरफ्लो’
जिल्ह्यातील ३३ लघुप्रकल्प १०० टक्के भरले असून, त्यात मानोरा तालुक्यातील १३ प्रकल्पांचा समावेश आहे. मानोरा तालुक्यातील इतर प्रकल्पांची स्थिती चांगली असून, या तालुक्यातील एकूण २५ प्रकल्पांत मिळून ८६.५८ टक्के जलसाठा झाला आहे.
----------
१०० टक्के भरलेले प्रकल्प
तालुका - शंभर टक्के पातळीचे प्रकल्प
वाशिम - २
मालेगाव - ८
रिसोड - ३
मंगरूळपीर - ६
मानोरा - १३
कारंजा - १