शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सुरळीत विजेसाठी अकोला परिमंडलातील ३ हजार कर्मचारी कर्तव्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:43 IST

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे स्वरूप बघता ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिलेल्या निर्देशानुसार सर्व शासकीय तसेच खासगी रुग्णालये, कोविडचे विशेष ...

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे स्वरूप बघता ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिलेल्या निर्देशानुसार सर्व शासकीय तसेच खासगी रुग्णालये, कोविडचे विशेष कक्ष,विलगीकरण कक्ष याशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थाच्या अत्यावश्यक सेवांना अखंडित वीजपुरवठा मिळेल याची विशेष खबरदारी महावितरणकडून घेतल्या जात आहे.या शिवाय अत्यावश्यक सेवेसाठी तत्काळ नवीन वीज जोडणी देण्याची प्रक्रियाही महावितरणकडून राबविली जात आहे. नागरिकांना घरी बसणे सुरळीत वीज पुरवठ्यामुळेच शक्य होत आहे. त्यातच आता दिवसेंदिवस ऊन्हाचा पारा वाढत आहे. सर्वच नागरिक घरी असल्याने टीव्हीसह विविध विजेवर चालणाऱ्या उपकरणांचा वापर वाढला आहे. त्यामुळे काही ठिकाणी विविध कारणाने वीजपुरवठा खंडित झाल्यास महावितरणचे कर्मचारी तातडीने धाव घेऊन तो पूर्ववत करत आहेत. कोरोनाच्या संकटातही महावितरणचे कर्मचारी जीवावर उदार होऊन काम करत आहेत.

अकोला परिमंडलाअंतर्गत अकोला, बुलडाणा व वाशिम जिल्ह्यात महावितरणचे ३०० अभियंते,१५७१ जनमित्र, २७९ यंत्रचालक, ३७१ बाह्यस्त्रोत कर्मचारी वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी धडपडत आहे. यासोबतच तांत्रिक कर्मचाऱ्यांच्या सहाय्यासाठी व्यवस्थापनातील ४५१ पेक्षा अधिक अतांत्रिक कर्मचारीही आपली सेवा बजावत आहे. कोरोनाचे संकट बघता महावितरणचे कर्तव्य बजावतांना गेल्या वर्षभरात अकोला २४३ कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. सद्य:स्थितीत ५९ कर्मचारी हे कोरोना बाधित असून ३ कर्मचाऱ्यांनी या जगाचा निरोप घेतला आहे.तरीही महावितरण ग्राहकांच्या सेवेत आहे. वीज ग्राहकांनी कोरोना विरुध्दच्या या लढाईत मास्क लावून फिजिकल डिस्टन्सिग राखत शासनाने वेळोवेळी दिलेल्या निर्देशाचे पालन करावे, असे आवाहन महावितरणच्यावतीने करण्यात येत आहे.