शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाला कधी मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष?; अचानक घडलेल्या घडामोडींमुळे झाला विलंब, काय आहे कारण?
2
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
3
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
4
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
5
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
6
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
7
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
8
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
9
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
10
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
11
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
12
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
13
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
14
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
15
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
16
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
17
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
18
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
19
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
20
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?

वाशिम जिल्ह्यात १२७ प्रजातींच्या ३ हजार पक्ष्यांची नोंद

By admin | Updated: March 3, 2017 01:06 IST

‘ग्रेट बॅकयार्ड बर्ड काऊंट’: पक्षी अभ्यासकांना विद्यार्थ्याचे मौलिक सहकार्य

वाशिम, दि.२ : ग्रेट बँकयार्ड बर्ड काऊंटिंग कार्यक्रमांतर्गत वाशिम जिल्ह्यात पक्षी अभ्यासक आणि विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी मिळून केलेल्या पक्षी निरक्षणात वाशिम जिल्ह्यात १२७ प्रजातींचे ३ हजार १६३ पक्षी आढळून आले. ही माहिती वत्सगुल्म जैवविविधता संवर्धन संस्थेचे पक्षी अभ्यासक मिलिंद सावदेकर यांनी बुधवारी ही माहिती दिली. वत्सगुल्म जैवविविधता संवर्धन संस्थेचे पक्षी अभ्यासक मिलिंद सावदेकर, अकोला येथील पक्षी अभ्यासक रवि धोंगळे, सतिश धोंगळे, वाशिम येथील निलेश सरनाईक, प्रा. हेमंत कुमार वंजारी, निखिल गोरे, अक्षय खंडारे यांच्यासह बाकलीवाल विद्यालयातील अस्मिता संगवार, ऐश्वर्या पाचपिल्ले, सारिका मोरे, विवेक गोरे, जयेश गड्डम, जय मोटे, कार्तिक रंगभाळ, प्रतिक्षा सुरूशे, वर्षाली देशकर, वैष्णवी वानखडे, श्वेता अंभोरे, अंकिता इंगळे यांनी, तर शिवाजी विद्यालयातील वैष्णवी बोरकर आणि राधादेवी बाकलीवाल विद्यालयातील जान्हवी पवार, सारिका डिंकुटवार, रुपाली इंगोले, या १७ विद्यार्थ्यांनी वाशिम जिल्ह्यातील एकबूर्जी तलाव, संतोषी माता नगर वाशिम-शेलुबाजार मार्ग, इरिगेशन कॉलनी कारंजा, काजळेश्वर कारंजा लाडसह इतर काही जलाशये आणि मोकळ्या जागेवर फिरून पक्ष्यांचे निरीक्षण केले. या ग्रेट बॅकयार्ड बर्ड काऊंट कार्यक्रमांतर्गत त्यांनी ३ हजार १६३ पक्षांच्या नोंदी केल्या. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी बर्ड कॉउंट पक्षी नोंदीचे महत्व व प्रत्यक्ष पक्षी नोंदणी कशी करावी हे जाणून घेतले. दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याने पशुपक्ष्यांच्या अनेक प्रजाती नष्ट होत आहेत. सजीवसृष्टीत पक्ष्यांचे महत्त्व पटवून देण्यासह त्यांचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने दरवर्षी ग्रेट बँकयार्ड बर्ड काऊंट हा कार्यक्रम राबविण्यात येतो. यंदा या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा मोठा उत्साह दिसून आला. पक्षी निरीक्षण हा आनंददायी छंद असला तरी, त्याला शास्त्रीय ज्ञानाची दुसरी बाजू आहे. त्यामुळेच पक्ष्यांचे निरीक्षण करताना गोळा होणारी माहिती पक्ष्यांबद्दलच्या अनेक अनुत्तरीत प्रश्नांची उकल करते. एकबुर्जी प्रकल्प परिसरात ११२ प्रजाती पक्षी अभ्यासक मिलिंद सावदेकर व त्यांच्या सहकाऱ्यांसह विद्यार्थ्यांनी केलेल्या पक्षी निरीक्षणात केवळ वाशिम तालुक्यातील एकबूर्र्जी प्रकल्पावर तब्बल ११२ प्रजातींचे २ हजार ७२० पक्षी आढळून आले. यामध्ये रेडी शेल डक , बार हेडेड गूज, नादरन शोवेलर, कॉमन पोचार्ड डक, यलो वॅगटेल, लेसर व्हिसलिंग डक, स्राईप आदि स्थलांतर करणाऱ्या विदेशी पक्ष्यांसह विदर्भात प्रामुख्याने मोठ्या संख्येत असलेला फ्लेमिंगोसह रिव्हर टर्न या पक्षाचा समावेश आहे. वत्सगुल्म जैवविविधता संवर्धन संस्थेच्या मार्गदर्शनात विद्यार्थी व पक्षी अभ्यासकांनी जवळपास १२ तास एकबूर्जी प्रकल्पावर घालवत या पक्षांंच्या नोंदी घेतल्या.