रिसोड , दि. ३0- स्थानिक गैबीपुरा येथील ३0 वर्षीय महिला ९0 टक्के जळाल्याने तिचा मृत्यू झाला. ही घटना ८ जानेवारी रोजी घडली असून, ग्रामीण रुग्णालयामार्फत पोलीस स्टेशनला ३0 जानेवारीला मेमो प्राप्त झाला. याबाबत प्राप्त माहितीनुसार, नजमा खातून असमन खान ही महिला ९0 टक्के जळाल्याने तिला अको ला येथे उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी रिसोड पोलिसांनी ३0 जानेवारीला आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
३0 वर्षीय महिलेचा जळून मृत्यू!
By admin | Updated: January 31, 2017 02:47 IST