शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मतदार यादीतील नाव वगळण्यासाठी ३० हजारांवर अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 13:51 IST

वाशिम: निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात राबविण्यात येत असलेल्या मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत वाशिम जिल्ह्यात मयत किंवा स्थलांतरीत मतदारांची नावे वगळण्यासाठी ३ आॅगस्टपर्यंत प्राप्त झालेल्या ३० हजार ७२७ अर्जांपैकी ११ हजार ३३६ मंजूर करण्यात आले, तर ९५ खारीज करण्यात आले आहेत. याच कार्यक्रमातंर्गत १ जानेवारी २०१७  रोजीच्या अर्हता दिनांकानुसार मतदार यादीत ...

ठळक मुद्देनव मतदार नोंदणीची संख्या अल्प ५ हजार ३२७ अर्जांपैकी ३ हजार ८८२ मंजूर करण्यात आले

वाशिम: निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात राबविण्यात येत असलेल्या मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत वाशिम जिल्ह्यात मयत किंवा स्थलांतरीत मतदारांची नावे वगळण्यासाठी ३ आॅगस्टपर्यंत प्राप्त झालेल्या ३० हजार ७२७ अर्जांपैकी ११ हजार ३३६ मंजूर करण्यात आले, तर ९५ खारीज करण्यात आले आहेत. याच कार्यक्रमातंर्गत १ जानेवारी २०१७  रोजीच्या अर्हता दिनांकानुसार मतदार यादीत नव्याने नाव दाखल करण्यासाठी प्राप्त ५ हजार ३२७ अर्जांपैकी ३ हजार ८८२ मंजूर करण्यात आले, तर ६९ अर्ज खारीज करण्यात आले.  

येत्या काही दिवसांत राज्यभरात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीसह इतर निवडणुकांच्या पृष्ठभूमीवर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाला १ जुलैपासून सुरूवात करण्यात आली. सुरुवातीला ३१ जुलैपर्यंत असलेली मुदत वाढविण्यात आली असून, या अंतर्गत वाशिम जिल्ह्यात मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी ५ हजार ३२७ मतदारांनी नमुना ६ हा फार्म भरून दिला आहे. त्यामधील ३ हजार ८८२ मतदारांची नोंदणी करण्यात आली, तर ६९ अर्ज खारीज करण्यात आले आणि १ हजार ४२१ अर्ज अद्याप प्रलंबित आहेत. मयत किंवा स्थलांतरीत झालेल्या मतदारांची नावे वगळण्यासाठी आवश्यक असलेल्या नमुना ७ चे ३० हजार ७२७ अर्र्ज दाखल करण्यात आले आहेत. त्यामधील ११ हजार ३३६ मतदारांची नावे वगळण्यात आली, तर ९५ अर्ज खारीज करण्यात आले असून, १९ हजार २९६ अर्ज प्रलंबित आहेत. त्याशिवाय मतदापर यादीमधीन मुद्रण दोष दुरुस्त करण्यासाठी आवश्यक असलेल्या नमुना ८ चे ३ हजार ७१ अर्ज निवडणूक कार्यालयाकडे दाखल करण्यात आले. त्यामधील  १ हजार ५८८ मतदारांच्या ओळखपत्रात दुरुस्ती करण्यात आली, तर ७ अर्ज खारीज करण्यात आले आहेत आणि १ हजार ४७६ अर्ज प्रलंबित आहेत. त्याशिवाय निवासी पत्त्यामधील बदलासाठी आवश्यक असलेल्या नमुना ८ अ चे ९५ अर्ज जिल्हा निवडणूक कार्यालयाकडे प्राप्त झाले असून, त्यामधील ५७ लोकांच्या निवासी पत्त्यामध्ये बदल करण्यात आला आणि ३८ लोकांचे अर्ज अद्याप प्रलंबित आहेत.