शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

जिल्ह्यातील ३0 प्रकल्प रखडले!

By admin | Updated: November 5, 2015 01:38 IST

वाशिम जिल्ह्यात केवळ ६८ हजार हेक्टरवर सिंचन.

वाशिम : शेतकर्‍यांचे हिरवे स्वप्न साकारणारे जिल्ह्यातील ३0 सिंचन प्रकल्प सुधारित प्रशासकीय मान्यतेच्या फेर्‍यातून अद्यापही बाहेर पडले नाहीत. परिणामी, सिंचन अनुशेषाचा आकडा फुगत असून, शेतकर्‍यांचा रबी हंगाम सिंचनाविना कोरडाच जात आहे. काळ बदलला, तसा शेती कसण्याच्या पद्धतीतही बदल होत गेला. शेतीतून अधिकाधिक उत्पादन घेण्याचा प्रयत्न शेतकर्‍यांकडून होत आहे. या प्रयत्नांना शासनाकडूनही सिंचन प्रकल्पांच्या स्वरुपात मूर्त रुप दिले जात आहे. सिंचनाच्या माध्यमातून हिरवे स्वप्न साकारणार्‍या वाशिम जिल्ह्यातील शेतकर्‍यांसमोर सद्यस्थितीत ३0 प्रकल्पाच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रश्न गहन बनला आहे. जलसंपदा विभागाकडे २३ आणि अन्य महामंडळांकडे सात असे एकूण ३0 प्रकल्प सुधारित प्रशासकीय मान्यतेअभावी ठप्प आहेत. जिल्ह्यातील किनखेड, वडगाव, कुकसा, टनका, चाकातीर्थ, गोंडेगाव, जयपूर, कोकलगाव, उकळी, जुमडा, राजगाव, सोनगव्हाण, वाकद, ढिल्ली, वरूड, झोडगा, मिर्झापूर, कोयाळी, पांगराबंदी, आसेगाव, गणेशपूर, उमरी, वाडी रायताळ आणि पळसखेड या प्रमुख प्रकल्पांची सुधारित प्रशासकीय मान्यता पाटबंधारे विभागाकडे प्रलंबित आहे. जिल्ह्यात एक लाख २१ हजार ८९९ हेक्टरवर सिंचन होणे अपेक्षित आहे. सद्यस्थितीत ६८ हजार हेक्टरवर सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. ३0 सिंचन प्रकल्प पुर्णत्वाकडे गेले तर शेतकर्‍यांचा सिंचनाचा प्रश्न बर्‍याच प्रमाणात निकाली निघणार आहे; मात्र या प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता मिळण्यासाठीच्या हालचालींना वेग नसल्याने किमान एक वर्षे तरी परिस्थिती ह्यजैसे थेह्ण राहण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. परिणामी, सिंचनाअभावी रब्बी हंगाम कोरडाच जाण्याची भीती कोरडवाहू शेतकर्‍यांमधून व्यक्त होत आहे.