साहेबराव राठोड मंगरूळपीर: ह्यप्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळेह्ण या संत तुकाराम महाराजांच्या प्रसिद्ध उक्तीचे प्रत्यंतर, जिल्ह्यातील गिंभा येथील रामकृष्ण पाटील यांनी घडविले आहे. गाठीशी फळबागेचा कुठलाही अनुभव नसताना, केवळ जिद्द आणि चिकाटीच्या बळावर, त्यांनी अवघ्या सात एकर खडकाळ जमिनीत, पपईचे तब्बल २८ लाख ६0 हजार रुपयांचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. मंगरूळपीर तालुक्यातील डोंगराळ भागात वसलेल्या गिंभा येथील रामकृष्ण भाउराव पाटील यांनी, डोंगरखेडच्या माता जगदंबा मंदिरानजीक असलेल्या सात एकर खडकाळ शेतीत, गाळाच्या मातीचा वापर करून, पाच हजार पपई झाडांची लागवड केली होती. गाळाच्या मातीमुळे झाडांची उत्कृष्ट वाढ झाली आणि कसदार फळे धरली. सुरूवातीला १३ रूपये, नंतर ६.५0 रूपये व शेवटी १२ रूपये किलो दराने त्यांनी पपईची विक्री केली. त्यामधून त्यांना तब्बल २८ लाख ६0 हजार रूपयांचे उत्पन्न पदरी पडले. एकूण ५ हजार झाडांपासून त्यांना सुमारे ३५ लाखांचे उत्पन्न अपेक्षित होते; परंतु मध्यंतरी झालेल्या वादळी पाऊस व गारपिटीचा तडाखा बसल्याने उत्पादनात थोडी घट झाली. फळबाग लागवडीचा कुठलाही अनुभव गाठीशी नसलेल्या रामकृष्ण पाटील यांना, पंचायत समितीचे कृषी अधिकारी पी. एस शेळके आणि पोटी येथील ङ्म्रीकांत गावंडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. दगडाला पाझर फोडणार्या या कामगिरीद्वारा रामकृष्ण पाटील यांनी इतर शेतकर्यांसमोर एक आदर्श उभा केला आहे.
खडकाळ जमिनीत पिकविली २८ लाखाची पपई!
By admin | Updated: August 17, 2014 00:10 IST