शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील २७८ कलावंतांचे मानधन आठ महिन्यांपासून प्रलंबित 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 14:04 IST

वाशिम :  जिल्ह्यातील तब्बल २७८ कलांवतांचे मानधन गेल्या सात ते आठ महिन्यांपासून प्रलंबित आहेत. त्यामुळे त्यांची यंदाची दिवाळी अंधारातच जाण्याची दाट चिन्हे दिसत आहेत.

ठळक मुद्देवृद्ध कलांवतांची परवड अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा पाठपुरावा 

वाशिम :  जिल्ह्यातील तब्बल २७८ कलांवतांचे मानधन गेल्या सात ते आठ महिन्यांपासून प्रलंबित आहेत. त्यामुळे त्यांची यंदाची दिवाळी अंधारातच जाण्याची दाट चिन्हे दिसत आहेत. या कलावतांच्या समस्येची जाण ठेवत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने १३ आॅक्टोबर रोजी सांस्कृतिक कार्य संचलनालयाच्या संचालकांना निवेदन पाठवून कलावंताचे मानध दिवाळीपूर्वी अदा करण्याची मागणी केली आहे. 

अंगी असलेल्या अभिजात कलागुणांचा प्रभावी वापर करून लोककलेच्या माध्यमातून विविध समस्यांबाबत जनजागृती करून शासनाच्या कार्यात हातभार लावतानाच जनतेच्या चेहºयावर हास्य पसरविणारे वृद्ध कलावंत स्वत: मात्र शासनाच्या उदासीन धोरणामुळे हतबल झाले आहेत. या कलांवंतांच्या समस्या सोडविण्यासाठी अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या कारंजा शाखेचे प्रमुख कार्यवाह श्रीकांत भाके व इतर कलावंतांचे प्रश्न सोडविण्यासाठी सतत पाठपुरावा करीत आहेत. वयोवृध्द साहित्यिक कलावंतांंचे मानधन संचालक सांस्कृतिक कार्य संचालनालय मुंबई यांनी घेतलेल्या निर्णयानुसार आता मानधन थेट कलावंतांच्या बँक खात्यात जमा करण्याचे निश्चित झाले आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी वर्ग-१ यांनी जिल्ह्यातील कलावंतांचे खाते क्रमांक संकलित करून ते संबंधित यंत्रणेकडेही पाठविले आहेत; परंतु या कार्यवाहीला बराच कालावधी उलटला तरी, कलावंतांच्या खात्यात मानधनाची दमडीही पडली नाही. ही बाब लक्षात घेऊन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कारंजाच्यावतीने पुन्हस १३ आॅक्टोबर रोजी सांस्कृतिक कार्य संचलनालयाच्या संचालकांकडे निवेदन पाठवून वृद्ध कलावंतांचे मानधन दिवाळीपूर्वी अदा करण्याची मागणी केली आहे. जिल्ह्यात साडे चारशेपेक्षा अधिक कलांवत असून, त्यामधील तब्बल २७८ कलावंतांचे मानधन आठ महिन्यांपासून प्रलंबित आहे. यातील निम्मे कलावंत आयुष्याच्या अखेरच्या वळणावर असून, त्यामधील बहुतेकांना अर्थाजनाचा दुसरा पर्यायसुद्धा उरलेला नाही. आयुष्यभर सामाजिक समस्या दूर करण्यासाठी जनजागृृती केली, लोकांना कलेच्या माध्यमातून जीवनाचा सन्मार्ग दाखविला, आता त्यांच्या समस्या मात्र दुर्लक्षीत असल्याने हे कलावंत हताश झाले आहेत.   

टॅग्स :cultureसांस्कृतिक