शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

कृषी पंपाची थकबाकी २७० कोटींवर!

By admin | Updated: June 13, 2017 01:18 IST

शेतकऱ्यांना सहकार्याचे आवाहन: आर्थिक स्थितीची महावितरणला जाणीव

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील कृषी पंपधारक शेतकऱ्यांकडे सन २०१४ पासून विजेची थकबाकी असून, ती आजमितीस तब्बल २७० कोटी रुपयांवर पोहोचली आहे. यामुळे महावितरण हतबल झाले असून, थकबाकीदार शेतकऱ्यांनी किमान चालू देयक तरी अदा करावे, असे आवाहन कार्यकारी अभियंत्यांनी केले आहे. वाशिम जिल्ह्यात सुमारे २६ हजार हेक्टर क्षेत्रावर सिंचनासाठी वीज पुरविली जाते. त्यात ४६ हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना कृषी पंपाची वीज जोडणी देण्यात आली आहे. या विजेच्या आधारे शेतकऱ्यांना रब्बी हंगामात गहू, हरभरा, सूर्यफूल, तीळ, करडई आदी पिकांसह भाजीपाल्याची लागवड करणे शक्य होत आहे. काही शेतकरी न चुकता विजेचे देयक अदा करतात; मात्र बहुतांश शेतकरी विविध कारणांमुळे नियमित वीज देयक अदा करू शकत नाहीत. अशा शेतकऱ्यांकडे असलेली थकबाकी २७० कोटी रुपयांवर गेली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील कृषी पंपधारक शेतकऱ्यांंपैकी ४० हजार ५०० कृषी पंपधारकांकडे ५ हजार किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचे वीज देयक थकीत आहे. शासनाच्या निर्देशानुसार नैसर्गिक आपत्तींचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची वीज जोडणी खंडित करण्यात येणार नसून, शेतकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने त्यांच्याकडे असलेली थकबाकी भरून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे. कृषी पंपांच्या थकबाकीची ही आकडेवारी मोठी वाटत असली तरी, ती एका वर्षातील नाही. त्यातच अनेक शेतकरी नियमित विजबिल भरणा करून वीज वितरणला सहकार्य करीत असल्याने कृषी पंपाच्या जोडणीलाही महावितरणकडून वेग देण्यात येत असल्याचे आकडेवारीहून स्पष्ट होते.