शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील २६ प्रकल्प ‘ओव्हर फ्लो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:42 IST

पावसाळा निम्मा उलटला असतानाही जिल्ह्यात सार्वत्रिक स्वरूपात आणि पाणलोट क्षेत्रात पावसाचा अभाव असल्याने १५ जुलैपर्यंतही प्रकल्पांची पातळी ३३ टक्क्यांवरच ...

पावसाळा निम्मा उलटला असतानाही जिल्ह्यात सार्वत्रिक स्वरूपात आणि पाणलोट क्षेत्रात पावसाचा अभाव असल्याने १५ जुलैपर्यंतही प्रकल्पांची पातळी ३३ टक्क्यांवरच होती. त्यात ३५ पेक्षा अधिक प्रकल्पांत २५ टक्केही जलसाठा झाला नव्हता. जून महिन्याच्या अखेरपासून पावसाने खंड दिल्याने प्रकल्पांच्या पातळीत किंचितही वाढ होऊ शकली नव्हती. त्यामुळे जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट ओढवते की काय, अशी भीतीही वाटू लागली होती. दरम्यान, जिल्ह्यात १२ जुलैपासून पावसाने ठाणच मांडले. सतत पडत असलेल्या पावसाने पिकांचे नुकसान झाले असले तरी प्रकल्पांच्या पातळीला मोठा आधार मिळाला आणि अवघ्या १० दिवसांत प्रकल्पांची पातळी ३३ टक्क्यांवरून वाढत ५२.३१ टक्क्यांवर पोहोचली. त्यात ३ मध्यम प्रकल्पांची सरासरी पातळी ६५.६० टक्के आहे. शिवाय २६ लघु प्रकल्प शंभर टक्के भरले, तर १३ प्रकल्पांत ७५ ते ९९ टक्के, २३ प्रकल्पांत ५० ते ७५ टक्के, तर ३६ प्रकल्पात २५ ते ५० टक्के जलसाठा झाला आहे.

----------

२३ प्रकल्पांत ठणठणाटच

जिल्ह्यातील १३७ पैकी २६ प्रकल्प शंभर टक्के भरले, तर ५२ प्रकल्पांत २५ ते ५० टक्क्यांपर्यंत जलसाठा झाला असला तरी ३८ प्रकल्पांची स्थिती गंभीर आहे. त्यात १२ प्रकल्पांत २५ टक्क्यांपेक्षा कमी, ३ प्रकल्पांत १० टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा आहे, तर २३ प्रकल्पांत अद्यापही ठणठणाटच आहे. त्यामुळे संबंधित भागांतील शेतकऱ्यांच्या सिंचनाची समस्या गंभीर होऊ शकते.

----------

मानोरा तालुक्याची स्थिती दमदार

जुलै महिन्याच्या मध्यंतरापासून पडत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली असली तरी जिल्ह्यात मानोरा तालुक्यातील प्रकल्पांची स्थिती सर्वात चांगली आहे. या तालुक्यातील १३ प्रकल्प शंभर टक्के भरले असून, तालुक्यातील २५ प्रकल्पांत सरासरी ८२ टक्के जलसाठा झाला आहे. या तालुक्यातील केवळ १ प्रकल्प १० टक्क्यांच्या खाली, तर एक प्रकल्प २५ टक्क्यांच्या खाली आहे.

--------------------------

वाशिम तालुक्याची स्थिती गंभीर

जुलै महिन्याच्या मध्यंतरापासून पडत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील प्रकल्पांच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली असताना वाशिम तालुक्यातील प्रकल्पांची स्थिती गंभीर आहे. या तालुक्यातील केवळ १ प्रकल्प शंभर टक्के भरला असून, तालुक्यातील १९ प्रकल्पांत मृतसाठाच आहे. तसेच २ प्रकल्पांत १० टक्क्यांपेक्षा कमी, तर ५ प्रकल्पांत २५ टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा असून, या तालुक्यातील केवळ १ प्रकल्प १० टक्क्यांच्या खाली, तर एक प्रकल्प २५ टक्क्यांच्या खाली आहे. तालुक्यातील ३६ प्रकल्पांत मिळून केवळ १८.४३ टक्के जलसाठा झाला आहे.

लघु प्रकल्पांतील तालुकानिहाय जलसाठा

तालुका - प्रकल्प - जलसाठा (टक्के)

वाशिम - ३६ - १८.४३

मालेगाव - २३ - ६५.३९

रिसोड - १९ - ३३.१८

मं.पीर. - १५ - ६३.०६

मानोरा - २५ - ८१.८९

कारंजा - १६ - ५३.७३

--------------------------

मध्यम प्रकल्पांची पातळी

प्रकल्प - पातळी (टक्के)

एक बुर्जी - ८९.६४

सोनल - ६१.४७

अडाण - ६२.३६