शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

२५ टक्के मोफत प्रवेश देणा-या शाळा शुल्क परताव्यापासून वंचित!

By admin | Updated: April 30, 2017 02:32 IST

तीन वर्षांंपासून प्रश्न ‘जैसे थे’; रक्कम पोहोचली तीन कोटीच्या घरात.

वाशिम : इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये २५ टक्के राखीव कोट्यातून मोफत प्रवेश देणार्‍या जिल्ह्यातील एकाही शाळेला गेल्या तीन वर्षांपासून शुल्क परतावा मिळालेला नाही. थकीत असलेली ही रक्कम तब्बल तीन कोटी रुपये असल्याची माहिती ह्यमेस्टाह्ण संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष गडेकर यांनी शनिवारी दिली.ज्यावर्षी विद्यार्थ्यांना २५ टक्के कोट्यातून शाळेत मोफत प्रवेश देण्यात आला, त्याचवर्षी शासनाकडून शुल्क परतावा मिळणे क्रमप्राप्त आहे; मात्र शिक्षण विभागाकडून यासंदर्भात कमालीची उदासीनता बाळगली जात आहे. गडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सन २0१४-१५ मध्ये जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांंना २५ टक्के कोट्यातून प्रवेश देण्यात आला. त्यापोटी शासनाकडून ८0 लाख मिळणे बाकी आहे. २0१५-१६ मधील ही रक्कम एक कोटी रुपये असून, २0१६-१७ मधील १.२५ कोटी रुपये शासनाकडून घेणे बाकी आहे. सुमारे तीन कोटी रुपये रक्कम शासनाकडे थकलेली असतानाही जिल्ह्यातील संस्थाचालकांनी कुठलीच तक्रार न ठेवता विद्यार्थ्यांंचे शैक्षणिक हित जोपासत २५ टक्के कोट्यातून मोफत प्रवेश दिला. तीन वर्षाच्या शुल्क परताव्याची रक्कम शासनाकडून शिक्षणाधिकार्‍यांच्या बँक खात्यात जमा असूनही एकाही शाळेला ती मिळालेली नाही. २५ टक्के शुल्क परताव्याच्या कागदपत्रांची पूर्तता करुनही वारंवार कागदपत्रांची मागणी केली जाते. गत दोन महिन्यांपासून संस्थाचालक शुल्क परताव्याची सातत्याने मागणी करीत असताना रक्कम मिळणे दुरापास्त झाल्याने शाळा चालविणे संस्थाचालकांना कठीण झाले आहे. तथापि, येत्या दोन दिवसात शुल्क परतावा न मिळाल्यास महाराष्ट्र इंग्रजी शाळा संस्थाचालक संघटनेचे पदाधिकारी व सदस्य शिक्षणाधिकारी, प्राथमिक यांचे कार्यालय व जिल्हा परिषदेवर लोकशाही पद्धतीने मोर्चा काढून आंदोलन करतील, असा इशारा मेस्टा संघटनेचे विदर्भ उपाध्यक्ष अभिजित देशमुख, जिल्हाध्यक्ष संतोष गडेकर व जिल्हा संघटक किरण चौधरी यांनी दिला आहे.जिल्ह्याच्या शिक्षण विभागाने २५ टक्के मोफत प्रवेश शुल्क परताव्याबाबत प्रचंड उदासीनता बाळगली आहे. नियमानुसार लागणार्‍या १२ कागदपत्रांची पूर्तता करूनही नाहक त्रास दिला जात आहे. गत तीन वर्षांंपासून कोट्यवधी रुपयाचा निधी शिक्षणाधिकार्‍यांच्या खात्यात जमा असताना तो देण्यास टाळाटाळ केली जात आहे. - संतोष गडेकरजिल्हाध्यक्ष, मेस्टा संघटना, वाशिम.