वाशिम : आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसार वाशिम तालुक्यात बुधवार आणि गुरुवार या दोन दिवसातच २१ लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तालुक्यात वाढत असलेला कोरोनाचा संसर्ग लक्षात घेत आरोग्य विभागाकडून संशयितांच्या कोरोना चाचणीवर अधिक भर देण्यात येत आहे.
आरोग्य विभागाच्या बुधवारी आलेल्या अहवालानुसार वाशिम शहरातील आययुडीपी कॉलनी येथील १, सुंदर वाटिका १, पोलीस स्थानक परिसर १, सिव्हील लाईन्स परिसर १, काळे फाईल ४, तिरुपती सिटी १, इतर ठिकाणचा १, तोंडगाव १, बाभूळगाव २, अडोळी १, जांभरूण महाली १, सुरकंडी १ आणि वारा येथील १ व्यक्ती बाधित असल्याचे निदान झाले. तर गुरुवार, २८ जानेवारीच्या अहवालानुसार वाशिम शहरातील जवाहर कॉलनी येथील १, गोरे गार्डनजवळील १, महेश नगर येथील १ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले. जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत जिल्हा मुख्यालय असलेल्या वाशिम शहरासह तालुक्यात कोरोना संसर्गाचा वेग वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग सतर्क झाला असून, बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची तातडीने कोरोना चाचणी केली जात आहे.