शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावात दोन लाख २0 हजाराची चोरी

By admin | Updated: January 17, 2015 00:43 IST

अज्ञात चोरटयांनी घरामध्ये प्रवेश करुन सोन्याचे दागिने, रोख रक्कम मिळून २ लाख २0 हजार रुपयाचा ऐवज लंपास केला.

मालेगाव (जि. वाशिम) : येथील संतोषी माता मंदिर शेलू फाट्यानजीक असलेल्या स्वप्निल गिरी यांच्या घराचे तिसर्‍या मजल्यावरील खिडकीचे काच तोडून अज्ञात चोरटयांनी घरामध्ये प्रवेश करुन सोन्याचे दागिने, रोख रक्कम मिळून २ लाख २0 हजार रुपयाचा ऐवज लंपास केला. ही घटना १४ जानेवारीचे रात्री घडली.स्वप्निल छगन गिरी यांची आई उमाबाई व भाऊ सुरज हे १४ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजताचे सुमारास माहूर येथे देवदर्शनासाठी गेले होते आणि स्वप्निल गिरी हे त्यांचे शेतामध्ये असलेल्या डेअरी प्लॅन्टवर गेले असल्याची संधी पाहून अज्ञात चोरट्यांनी त्यांचे घराच्या पश्‍चिमेकडील खिडकीचे काच तोडून घरात प्रवेश केला. घरातील आलमारी उघडून त्यामधील सोन्याच्या तीन नग नथ अंदाजे वजन ४ ग्रॅम, गहू पोथेचे मणी १0 ग्रॅम आणि काळे मणी असलेली सोन्याची चेन वजन ४0 ग्रॅम असे एकूण १,३५,000 रुपयांचे दागिने व रोख ४८,000 रुपये मिळून एकूण २,२0,000 रुपयाचा ऐवज लंपास केला. ही बाब १५ जानेवारी रोजी गिरी कुटुंबिय घरी परत आल्यानंतर लक्षात आली. याबाबत रात्री ११ वाजता पोलीस स्टेशनला सदर घटनेची फिर्याद दिली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध कलम ४५७, ४५४, ३८0 भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे. १६ जानेवारी रोजी सकाळी या चोरीच्या तपासासाठी वाशिम येथून श्‍वान पथक बोलाविण्यात आले हो ते. त्याने कुठलाही संकेत दिला नाही. यावेळी मॅक्सी श्‍वानपथकासोबत डॉग ट्रेनर शेजोळकर, पीएसआय गायकवाड, एलसीबीचे ए.पी. आय चव्हाण, पोहेकॉ तायडे, पोकॉ गोटे यांची उपस्थिती होती. मालेगावचे ठाणेदार आर.एस. तट यांचे मार्गदर्शनाखाली पीएसआय नांदगावकर, पोहेकॉ राजू गिरी, पोहेकॉ संतोष पाईकराव हे तपास करीत आहेत.