शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

धडक सिंचन योजनेतील १९०० विहिरींची कामे अपूर्णच!

By admin | Updated: May 4, 2017 01:23 IST

प्रशासनाची दमछाक : सहस्त्र सिंचनच्या विहिरींची कामेही संथ गतीने

वाशिम : धडक सिंचन योजनेतील विहिरींची कामे जून २०१६ पूर्वीच पूर्ण करून तसा अहवाल शासनाकडे सादर करावा, असे स्पष्ट निर्देश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. मात्र, वर्षभराचा कालावधी उलटत आला असताना जिल्ह्याला मिळालेल्या ७ हजार ८०० विहिरींच्या उद्दिष्टापैकी ५ हजार ९०० विहिरीच पूर्ण झाल्या असून, १ हजार ९०० विहिरींची कामे आजही अपूर्ण असल्याची माहिती सूत्रांनी बुधवार, ३ मे रोजी दिली.वाशिम जिल्ह्यात विद्यमान स्थितीत उणेपुरे तीन मध्यम आणि १२२ लघुप्रकल्प कार्यान्वित असून, त्याव्दारेच शेतकऱ्यांना रब्बी हंगामात सिंचनासाठी पाणी उपलब्ध होते. मात्र, ते पुरेसे नसून, जिल्ह्यातील सिंचनाचा अनुशेष प्रचंड प्रमाणात वाढत चालला आहे. त्यावर मात करण्यासाठी शासनाने धडक सिंचन विहीर योजनेंतर्गत जिल्ह्याला ७ हजार ८०० विहिरी दिल्या होत्या; परंतु २००६ पासून हे उद्दिष्ट पूर्ण करण्यात प्रशासनाला यश मिळालेले नाही. आजही १९०० विहिरींची कामे अपूर्णच असल्याचे दिसून येत आहे. धडक सिंचन विहीर योजनेतील मंजूर विहिरी विविध प्रशासकीय यंत्रणेकडून पूर्ण केल्या जात आहेत. त्यांच्याकडून वेळोवेळी विहीर पूर्ण झाल्याचा अहवाल मागविला जातो. मात्र, त्यास अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने संभ्रम वाढला आहे. - सुनील कोरडे, उपजिल्हाधिकारी, रोहयो, वाशिम