शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींसाठी १८ कोटींचा निधी

By admin | Updated: March 13, 2017 02:21 IST

वाशिम जिल्ह्यातील ४९१ ग्रामपंचायतींना होणार लाभ.

वाशिम, दि. १२- शासनाने १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून ग्रामपंचायतींना थेट निधी देण्याचे धोरण अवलंबिले असून, वाशिम जिल्ह्यातील ४९१ ग्रामपंचायतींसाठी दुसर्‍या टप्प्यातील १८ कोटींचा निधी जिल्हा परिषदेला प्राप्त झाला. या निधीचे लवकरच ग्रामपंचायतींना वितरण केले जाणार आहे. ह्यआमचं गाव -आमचा विकासह्ण या उपक्रमांतर्गत शासनाने थेट ग्रामपंचायतींना निधी देण्याचे धोरण अंमलात आणले आहे. लोकसंख्या आणि क्षेत्रफळाच्या आधारावर पुढील चार वर्षे ग्रामपंचायतींना १४ व्या वित्त आयोगातून भरघोष निधी मिळणार आहे. हा निधी कोणत्या बाबींवर खर्च करावा, यासाठी सन २0१६ मध्ये जून व जुलै महिन्यात गावनिहाय बैठका, सभा घेऊन ग्रामस्थांच्या सहकार्यातून कृती आराखडे बनविण्यात आले. आराखडा तयार करण्यासाठी ग्रामपंचायतींना मदत म्हणून जिल्ह्यात मास्टर ट्रेनरच्या नियुक्त्याही केल्या होत्या. ग्रामसभेने कृती आराखडा मंजूर केल्यानंतर निधीेंचे प्रस्ताव शासन दरबारी पाठविण्यात आले. सन २0१६-१७ या आर्थिक वर्षात पहिल्या टप्प्यात ४९१ ग्रामपंचायतींना १८ कोटी रुपयांचा निधी यापूर्वीच वाटप करण्यात आले. दुसर्‍या टप्प्यातील १८ कोटी रुपयांच्या निधीची प्रतीक्षा होती. हा निधी मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्राप्त झाला असून, लवकरच या निधीचे ग्रामपंचायतींना वितरण केले जाणार आहे, असे पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कापडे यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना सांगितले. सन २0१५-१६ या वर्षात ४९१ ग्रामपंचायतींना २६ कोटी रुपयांच्या निधीचे थेट वाटप केले होते. ग्रामसभेने मंजुरात दिलेल्या कृती आराखड्यातील कामांवर हा निधी खर्च करावा लागणार आहे. १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून ग्रामपंचायतींचे आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरण करण्यासाठी लाखो रुपयांचा हा निधी ग्रामपंचायतींना थेट पुरविला जात आहे. या निधी खर्चाचे लेखा परीक्षणही ग्रामपंचायतींना करावे लागणार आहे.