शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
3
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
4
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
5
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
6
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
7
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
8
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
9
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
10
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
11
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
12
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
13
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
14
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
15
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
16
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
17
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
18
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
19
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
20
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!

पालिकेच्या व्यापारी संकुलातील गाळेधारकांकडे १.७५ लाख थकित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 01:15 IST

मंगरुळपीर: स्थानिक नगर पालिकेच्या अखत्यारीतील व्यापारी संकुलातील ४६ गाळेधारकांकडे पावणे दोन लाख रुपयांहून अधिक भाडे थकित आहे. त्याशिवाय या संकुलाशेजारी असलेल्या २0 भुखंड लीजधारंकाकडे ९0 हजार रुपये भाडे थकित असून, या प्रकरणी पालिकेच्यावतीने सर्वच थकितदारांना भाडे भरण्याबाबतचे सूचना पत्र पाठविले आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी झालेल्या अनियमिततेची चौकशी करण्यात येणार असल्याने काही आजीमाजी नगरसेवकांसह गाळेधारक व अधिकार्‍यांवर कारवाईची शक्यता आहे.  

ठळक मुद्देमंगरुळपीरमधील प्रकारगाळे खाली करण्यासह भाडे भरण्याच्या सूचना 

प्रा. नंदलाल पवार । लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर: स्थानिक नगर पालिकेच्या अखत्यारीतील व्यापारी संकुलातील ४६ गाळेधारकांकडे पावणे दोन लाख रुपयांहून अधिक भाडे थकित आहे. त्याशिवाय या संकुलाशेजारी असलेल्या २0 भुखंड लीजधारंकाकडे ९0 हजार रुपये भाडे थकित असून, या प्रकरणी पालिकेच्यावतीने सर्वच थकितदारांना भाडे भरण्याबाबतचे सूचना पत्र पाठविले आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी झालेल्या अनियमिततेची चौकशी करण्यात येणार असल्याने काही आजीमाजी नगरसेवकांसह गाळेधारक व अधिकार्‍यांवर कारवाईची शक्यता आहे.  शहराच्या मध्यवर्ती भागातील  नगर पालिकेच्या व्यापारी संकुलातील ४७ पैकी ४६ गाळेधारकांकडे एप्रिल, ते जून असे तीन महिन्यांचे १,७५, ९७२ रुपये भाडे, तर २0 भूखंड धारकांकडे ९0, १५0 रुपये  भाडे थकित आहे. या प्रकरणी पालिका प्रशासनाने व्यापारी संकुलातील गाळेधारक व शेजारील  भूखंड धारकांचा करार संपल्याने गाळे व भुखंड खाली करुन थकित भाडे भरण्याची सुचनापत्रे पाठविली आहेत.  दरम्यान, याच प्रकरणी  नियमबाह्य कृती करून पालिकेचे आर्थिक नुकसान केल्यावरुन अनेक आजीमाजी नगरसेवकांच्या डोक्यावर कारवाईची टांगती तलवार आहे. त्याशिवाय आजी माजी अधिकार्‍यांनी कर्तव्यात कसूर करून पालिकेचे आर्थिक नुकसान करुन केले का, याची चौकशी करण्यासह कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.  नव्याने या व्यापारी संकुलाचा जाहीर लिलाव  करुन नगर पालिकेची आíथक सक्षमता  वाढविण्याची मागणी सुशिक्षीत बेरोजगार करीत आहेत. पालिका प्रशासनाच्या सूचनापत्रानुसार भाडे थकित असलेल्या गाळेधारकांमध्ये सुनिल श्रृंगारे, रामराव सुर्वे, प्रभाकर देशपांडे, महादेव लाडके, पंकज मेहता, गणेश जाधव,जयंत कुळकर्णी, संजय हेडा, दिपक गुल्हाणे, प्रविण देशमुख, विनोद भन्साली, विनोद परळीकर, चंद्रशेखर भोजणे, ओमप्रकाश उत्तरवार, मनिष भुतडा, विवेक नाकाडे, भगीरथ गट्टाणी, शाम भुतडा, रवि मोयल, रामदास उत्तरवार, भिमराव अवगण, दिपक मेहता, नंदकिशोर बजाज, महेंद्र भिमाणी, छाया गावंडे, योगेश तापडीया, डिगांबर सुर्वे, प्रदीप नानोटे, सुखदेव भगत, जयंत जोगी, मनोज इंगोले, ओमप्रकाश बंग, उल्हास व्यवहारे, आत्माराम खिराडे, भंवरीलाल बाहेती, राजेश जाखोटीया, सत्यनारायण बंग, नारायण मोयल, शिवाजी गेंड, डिगांबर दळवी, आदिंचा समावेश आहे.  

भूखंडधारकही कारवाईच्या घेर्‍यात पालिकेच्या संकुलाजवळील भूखंड २0 व्यावसायिकांनी लीजवर घेतले आहेत.यामधील काहींनी भूखंड विकसीत करून पोटभाडेकरुंना भाडेतत्त्वावर दिले आहे. त्यापोटी पोटभाडेकरूकडून त्यांनी मोठय़ा प्रमाणात अनामत रक्कमही वसुल केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामध्ये भिमराव साखरे, शामराव पाटील, परशराम पेंढारकर, विजय सोनोने, दादाराव भेंडेकर,  सुभाष फुके, सुरेश लहाने, विलास ठाकरे, संजय मेहता, मनोज व्यवहारे, बबन भेंडेकर, सुखदेव फुके, रामेश्‍वर ठाकरे, सुभाष फुके, अ.रशिद अ.काशीद, बळीराम भेंडेकर, घनशाम असावा, साहेबराव ठाकरे, प्रकाश आसरे, रतनलाल बियाणी यांचा समावेश असून,त्यामुळे या प्रकरणीही पालिका प्रशासनाकडून चौकशी करून कारवाई होण्याची शक्यता आहे.