शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

१७ वर्षीय मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू!

By admin | Updated: August 15, 2016 02:26 IST

हराळ येथील घटना.

हराळ (जि. वाशिम), दि १४ : नित्यनेमाप्रमाणे शेतशिवारात पीक पाहणी करण्यासाठी गेलेल्या हराळ येथील १७ वर्षीय विद्यार्थ्याचा विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवार, १४ ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आली. याबाबत प्राप्त माहितीनुसार, हराळ येथील संतोष मदन सरकटे नामक मुलगा १३ ऑगस्टला सायंकाळी नेहमीप्रमाणे शेतात पिकाची पाहणी करण्यासाठी गेला होता. रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्यामुळे गावकरी व कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला असता, रविवारी सकाळी शादिक घनकर यांच्या शेतातील विहिरीत त्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेची वार्ता गावात वार्‍यासारखी पसरली आणि संपूर्ण गावावर शोककळा पसरली. दरम्यान, तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी सरकटे, पोलीस पाटील अतिवीर जोगी, राजू ज्ञानबा सरकटे, नागेश रामभाऊ सरकटे, राजू धनगर यांनी पोलीस स्टेशनला माहिती दिली. पोलीस निरीक्षक व्ही.पी.खुळे, हेंबाडे यांनी घटनास्थळी हजर होऊन पंचनामा केला. मृतक मुलगा हा इयत्ता १२ वीला शिकत होता. त्याचे वडील अल्पभूधारक शेतकरी असल्याची माहिती आहे.