शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

१७ वर्षांमध्ये २0 कृषी विकास अधिकारी!

By admin | Updated: June 29, 2015 01:36 IST

वाशिम जिल्हा परिषदेत रूजू होण्यास अधिकारी निरुत्साही.

शिखरचंद बागरेचा / वाशिम : १ जुलै १९९८ ते ४ जून २0१५ या १७ वर्षांत वाशिम जिल्हा परिषदेला तब्बल १९ कृषी विकास अधिकारी लाभले आहेत. आता कृषी विकास अधिकारी म्हणून पी.जी. कुळकर्णी यांची वर्णी लागली आहे. ते २0 दिवसानंतरही रुजू झाले नसल्यामुळे तूर्तास जिल्हा कृषी अधिकारी (सामान्य) अभिजित देवगिरकर यांच्याकडे कृषी विकास अधिकार्‍याचा प्रभार सोपविण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या कृषीविषयक योजना पात्र शेतकर्‍यांपर्यंत पोहचविणे, हेक्टरनिहाय पीक नियोजन, खतांचे नियोजन, आपत्कालीन परिस्थितीत शेतकर्‍यांना मार्गदर्शन यांसह विविध कामांची जबाबदारी कृषी विभागावर सोपविण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचे प्रमुख म्हणून कृषी विकास अधिकारी यांची नेमणूक शासनातर्फे केली जाते. अकोला जिल्ह्यातून स्वतंत्र जिल्हा म्हणून वाशिमची स्थापना १ जुलै १९९८ रोजी झाली. तेव्हापासून वाशिम जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचा वाशिममध्ये स्वतंत्रपणे कारभार सुरू आहे. प्रथम कृषी विकास अधिकारी म्हणून डी. के. पांडे यांनी सेवा दिली. त्यानंतर जिल्हा परिषदेला नियमित व पूर्णवेळ कृषी विकास अधिकारी कमी लाभले. १७ वर्षांमध्ये तब्बल २0 कृषी विकास अधिकारी वाशिमला लाभले आहेत. यामध्ये डी.के. पांडे, एम.ए. शेख (तीन वेळा), प्रकाश लोखंडे (पाच वेळा), अ.म. इंगळे, एस.एम. सोळुंके, डी.डी. इंगळे, एन.व्ही. देशमुख (दोन वेळा), पी.के. खंडारे, अनिल बोंडे, पी.एस. शेळके, चंद्रकांत सूर्यवंशी यांचा समावेश आहे. १८ वे कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांची कोल्हापूर येथे समकक्ष पदावर बदली झाल्याने १९ वे कृषी विकास अधिकारी म्हणून पी.जी. कुळकर्णी यांची वाशिम येथे समकक्ष पदावर वर्णी लागली आहे; मात्र कुलकर्णी २0 दिवसानंतरही रुजू झाले नसल्यामुळे तूर्तास या पदाचा प्रभार जिल्हा कृषी अधिकारी (सामान्य) अभिजित देवगिरकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. त्यामुळे कृषी विकास अधिकारी पदाचा कार्यभार सांभाळणारे देवगिरकर १९ वे अधिकारी ठरले आहेत. कुलकर्णी रुजू झाल्यानंतर कृषी विभागाला २0 वे अधिकारी मिळणार आहेत. तब्बल १३ वेळा कृषी विभागाला प्रभारी कृषी विकास अधिकार्‍यांनी सेवा दिली, तर सहा कृषी विकास अधिकारी नियमित लाभले. यामध्ये डी.के. पांडे, अ.म. इंगळे, एस.एम. सोळुंके, एन.व्ही. देशमुख (दोन वेळा) आणि चंद्रकांत सूर्यवंशी अशा सहा नियमित अधिकार्‍यांचा समावेश आहे. वाशिमसारख्या छोट्याशा जिल्ह्यात अधिकारी रुजू होण्यास फारसे उत्सुक नसतात, हे १७ वर्षांत २0 अधिकार्‍यांच्या कार्यकाळाने दाखवून दिले आहे.