वाशिम : सन २0१३- १४ च्या पावसाळय़ात जिल्हय़ात वारंवार अतवृष्टी व जिल्हय़ातील १0३ पाटबंधारे प्रकल्पांपैकी ८५ प्रकल्पात १00 टक्के तर उर्वरित १८ प्रकल्पात टक्क्याहून अधिक जलसाठा झालेला असताना सध्या पाऊस लांबला असल्याच्या स्थितीत जिल्हय़ातील १0३ पाटबंधारे प्रकल्पां पैकी ३६ प्रकल्पात शून्य टक्के तर उर्वरित बहुतांश ५0 टक्क्यांच्या आत जलसाठा आहे. जिल्हय़ातील सर्व प्रकल्प मिळून जिल्हय़ात अवघा १५.४७ टक्के जलसाठा आहे.जिल्हय़ात दरवर्षी सरासरी ७९८ मि.मि. एवढा पाऊस पडतो. सन २0१३-१४ च्या पावसाळय़ात जिल्हय़ाच्या वार्षिक सरासरीच्या तब्बल दीड पट १२४७ मि.मि.एवढा पाऊस पडला. त्यामुळे जिल्हय़ातील १0३ पाटबंधारे प्रकल्पांपैकी ८५ प्रकल्पात १00 टक्के जलसाठा झाला होता. उर्वरित १३ प्रकल्पात ३0 ते ९९ टक्के एवढा जलसाठा झाला होता. अतवृष्टी व सतत पावसाने पूर येऊन पिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. विशेष म्हणजे मार्च, एप्रिल महिन्यात गारपिटीसह मोठय़ा प्रमाणात वादळी पाऊस पडला होता.त्यामुळे खरे तर धरणांमध्ये अद्यापपर्यंत मुबलक प्रमाणात जलसाठा उपलब्ध असणे आवश्यक होते; परंतु जिल्हय़ात धरणांवरुन प्रत्यक्ष पाणी मागणी पेक्षा जास्त प्रमाणात सिंचनासाठी पाणी उपसा करण्यात आल्यामुळे व उन्हाळयात बाष्पीभवनामुळे धरणांची पाणी पातळी खालावली. सद्यस्थितीत जिल्हय़ातील तीन मध्यम प्रकल्पांपैकी सोनल प्रकल्पात २७.१९ टक्के, वाशिम शहराला पाणीपुरवठा करणार्या एकबुर्जी प्रकल्पात १९.८८ टक्के, तर कारंजा शहराला पाणीपुरवठा करणार्या अडाण प्रकल्पात ११.६१ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. जिल्हय़ातील हे तिन्ही मध्यम प्रकल्प मिळून मध्यम प्रकल्पांमध्ये एकूण १५.६१ जलसाठा उपलब्ध आहे.जिल्हय़ातील १00 लघु पाटबंधारे प्रकल्पात एकूण १५.५६ टक्के जलसाठा आहे. या प्रकल्पांपैकी वाशिम तालुक्यातील अनसिंग, काजळंबा, कळंबमहाली, कार्ली, खंडाळा, सांवगा, सोनखास, सोयता, उमराकापसेसह ३६ प्रकल्पात सद्यस्थिातीत शून्य टक्के पाणीसाठा आहे.या व्यतिरिक्त मानोरा तालुक्यातील पंचाळा, लघु पाटबंधारे प्रकल्पात 0.५२ टक्के, कार्ली प्रकल्पात 0.९२ टक्के, कारंजा तालुक्यातील बग्गी प्रकल्पात 0.0६ टक्के, मालेगाव तालुक्यातील धारपिंप्री प्रकल्पात 0.९३ टक्के, टक्के वाशिम तालुक्यात वाईसावळी प्रकल्पात ३.७७ टक्के, मानोरा तालुक्यातील आसोला गव्हा प्रकल्पात ३.५५ टक्के, चिखली प्रकल्पात ३.0६ टक्के मंगरुळपीर तालुक्यातील मोहरी प्रकल्पात ४.0१ टक्के, सार्सी बोथ प्रकल्पात ४.९७ टक्क्े, मंगररुळपीर तालुक्यातील पिंप्री खुर्द प्रकल्पात ५.९३ टक्के, अशा प्रकारे अनेक प्रकल्पात अत्यल्प जलसाठा आहे.येत्या दोन आठवड्यात पाऊस आला नाही तर जिल्हय़ात तीव्र पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता दिसून येत आहे.
वाशिम जिल्हय़ात अवघा १५.५७ टक्के जलसाठा
By admin | Updated: June 28, 2014 01:40 IST