शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्हा परिषदेच्या १५३ शाळा ‘नवोपक्रमशील’

By admin | Updated: April 2, 2016 01:22 IST

नवीन उपक्रमांचा समावेश: ज्ञानरचनावादावर आधारित शिक्षण पद्धती.

संतोष वानखडे/वाशिमस्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचाविण्यासाठी दिशादर्शक ठरणारा ह्यनवोपक्रमशील शाळाह्ण उपक्रम जिल्ह्यातील १५३ जिल्हा परिषद शाळांमध्ये साकारला असून, पुढील वर्षी यामध्ये वाढ करण्याचा संकल्प शिक्षण विभागाने सोडला आहे.खासगी शाळांच्या तुलनेत नगर परिषद, महानगरपालिका आणि जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक दर्जा खालावला असल्याची ओरड नेहमीच होत आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या शाळांना स्पर्धेत टिकविण्यासाठी शासन विविध प्रयोग करीत आहे. या प्रयोगाचा एक भाग म्हणून राज्य शासन ह्यप्रगत शैक्षणिक महाराष्ट्रह्ण अभियान राबवित आहे. या अभियानांतर्गत शैक्षणिक क्षेत्रात क्रांतिकारक ठरणारे उपक्रम साकारले जात आहेत. त्यापैकीच एक असलेला ह्यनवोपक्रमशील शाळाह्ण उपक्रम वाशिम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. पहिल्याच वर्षात जिल्ह्यातील १५३ शाळांमध्ये हा उपक्रम साकारला आहे. नानाविध प्रयोगाद्वारे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणार्‍या या नवोपक्रमशील शाळांमध्ये हसत-खेळत अध्ययन-अध्यापन पद्धती, विद्या परिषद पुणे येथून विशेष प्रशिक्षण घेतलेल्या शिक्षकांद्वारे ज्ञानरचनावादावर आधारित शिक्षण, शाळेला ह्यडिजिटलह्णची जोड मिळत आहे. शाळा बोलक्या होण्यासाठी भिंतींवर शिक्षणासंबंधी बोलकी छायाचित्रे, शाळांमध्ये आवश्यक त्या भौतिक सुविधा उपलब्ध करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न या ह्यनवोपक्रमशीलह्ण शाळांमधून होत आहे. रिसोड तालुक्यातील २८ शाळांनी ह्यनवोपक्रमशीलह्ण उपक्रम प्रत्यक्षात साकारला आहे. याप्रमाणेच मंगरुळपीर २५, वाशिम २५, मानोरा २५, मालेगाव २५ व कारंजा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या २५ शाळा आहेत. केवळ पुस्तकी ज्ञानापुरते विद्यार्थ्यांना र्मयादित न ठेवता व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न या शाळांमधून होत असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले. सन २0१६-१७ या शैक्षणिक सत्रात आणखी काही शाळांमध्ये हा उपक्रम राबविला जाणार आहे.