शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

१.५ कोटींचा रस्ता निकृष्ट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 01:33 IST

मंगरूळपीर: शहरातील बायपास रोड व मानोरा चौक ते बिरबलनाथ चौक या दीड कोटींच्या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे.

ठळक मुद्देचौकशीची मागणी: दहा नगरसेवकांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरूळपीर: शहरातील बायपास रोड व मानोरा चौक ते बिरबलनाथ चौक या दीड कोटींच्या रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे. यासंदर्भात नागरिकांच्या तक्रारींची दखल घेण्यात येत नसल्याने पालिकेतील नगरसेवकच आक्रमक झाले असून, या कामाची गुणवत्ता नियंत्रण विभागातर्फे चौकशी करून संबंधित कंत्राटराला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी दहा नगरसेवकांनी गुरुवारी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनात नमूद आहे, की शहरातील मानोरा चौक ते बिरबलनाथ चौकापर्यंत सहा महिन्यांपूर्वी १ कोटी ६६ लाख रुपयांचा रस्ता बांधण्यात आला. याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले नसून, ते १० लाख रुपयांनी वाढविण्यात आले आहे, तसेच याच कंत्राटदाराने बायपास रस्त्याचे काम केले असून, सदर काम ४० लाख रुपयांचे आहे. मे महिन्यात या रस्त्याचे काम झाले असून, दोन महिन्यांतच या ठिकाणी खड्डे पडले आहेत. या रस्त्यात समानता नसून, अंदाजपत्रकानुसार साहित्य वापरण्यात आले नाही. कंत्राटदारासोबत पालिकेच्या काही अधिकारी, कर्मचाºयांचे साटेलोटे असल्याने १५ जून रोजी आम्ही तक्रार करूनसुद्धा काहीच कारवाई झाली नाही. कंत्राटदाराचे देयक दोन तीन दिवसांत मुख्याधिकारी काढणार असल्याचे समजते. त्यामुळे अंदाजपत्रकानुसार रस्त्याचे काम करावे, कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावे व कामाची गुणवत्ता नियंत्रण विभागातर्फे चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली असून, निवेदनावर नगरसेवक तथा गटनेते, प्रा.वीरेंद्रसिंह ठाकूर, पुरुषोत्तम चितलांगे, अनिल गावंडे, उषा हिवरकर, सचिन पवार, ज्योती लवटे, आकाश संगत, मो. अफसर, निदाफिरदोस, जहागीरदार, शे.सलमा मो इरफान यांच्या स्वाक्षरी आहेत. सदर रस्त्यांची उंची जास्त असल्याने नागरिकांना घरातून वाहने काढण्यास त्रास होत आहे, तसेच यामुळे अतिक्रमण वाढले असून, चुकीच्या कामामुळे शासनाचा निधी व्यर्थ ठरला आहे.आमदारांनीही दिल्या चौकशीच्या सूचनामंगरूळपीर शहरात विशेष रस्ता अनुदानांतर्गत करण्यात आलेल्या १४ कामांची तक्रार यापूर्वी सात नगरसेवकांसह नागरिकांच्यावतीने मंगरूळपीर-वाशिमचे आमदार लखन मलिक यांच्याकडे केली होती. आमदार लखन मलिक यांनी त्या तक्रारींची दखल घेऊन नगर परिषदेच्या मुख्याधिकाºयांना पत्र पाठवित या कामांची चौकशी करून संबंधित कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याच्या सूचना केल्या होत्या. तथापि, या रस्ता कामांची पाहणी करण्यास पालिकेकडून कोणताही कर्मचारी, अधिकारी अद्याप आढळला नाही. त्यामुळे महिनाभरापूर्वी पाठविण्यात आलेल्या आमदारांच्या पत्राची दखल पालिकेने घेतली की नाही किंवा काही चौकशी केली की नाही, हेसुद्धा कळायला मार्ग नाही. आता मुख्यमंत्री नगरसेवकांच्या तक्रारींची दखल कधी घेतात आणि काय कार्यवाही करतात, त्याकडे लक्ष लागले आहे.शहरातील रस्ता कामांची चौकशी पालिकेच्या बांधकाम विभागाकडून करण्यात येत आहे. त्याबाबत संबंधित अभियंता आणि विभागाच्या इतर कर्मचाºयांना सूचना देण्यात आल्या आहेत. यापूर्वीही कामांची पाहणी करण्यात आली असून, अहवाल तयार झाल्यानंतर वरिष्ठांसह आमदारांकडे त्वरित पाठविण्यात येईल.- श्रीकृष्ण वाहुरवाघ,मुख्याधिकारी, नगर परिषद मंगरूळपीर.