शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

१४८ शिक्षकांची आज पदस्थापना!

By admin | Updated: July 17, 2017 02:38 IST

आंतरजिल्हा बदली प्रकरण : समुपदेशन पद्धतीने मिळणार जिल्हा परिषद शाळा

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: आंतरजिल्हा बदली प्रक्रियेतून वाशिम जिल्ह्यात बदलून आलेल्या १४७ प्राथमिक शिक्षकांना समुपदेशन पद्धतीने १७ जुलै रोजी जिल्हा परिषद शाळांतील रिक्त पदांवर सामावून घेतले जाणार आहे.गत काही वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची आंतरजिल्हा बदली प्रक्रिया बंद असल्याने शिक्षकांना विविध गैरसोयींना सामोरे जावे लागले. आंतरजिल्हा बदली प्रकरण निकाली काढण्याची मागणी विविध शिक्षक संघटनांकडून वारंवार झाली. शासनस्तरावर या मागणीचा सकारात्मक विचार झाल्याने आंतरजिल्हा बदलीप्रकरणी शासनाने २४ एप्रिल २०१७ अन्वये सुधारित धोरण निश्चित केले. त्यानुसार इच्छुक शिक्षकांकडून संबंधित पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयात आॅनलाइन पद्धतीने अर्ज मागविले होते. ही प्रक्रिया मे व जून महिन्यात पार पडली. त्यानंतर शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रिया पूर्ण झाली. या प्रक्रियेत वाशिम जिल्ह्यात एकूण २१३ शिक्षक बदलीस पात्र ठरले आहेत, तर वाशिम जिल्ह्यातील एकूण ७४ शिक्षक अन्य जिल्ह्यात बदलून गेले. २१३ पैकी १४८ शिक्षक जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात रुजू झाले आहेत. या शिक्षकांना जिल्हा परिषद शाळांमधील रिक्त जागांवर पदस्थापना दिली जाणार आहे. ही प्रक्रिया पारदर्शकतेने राबविण्याच्या दृष्टिकोनातून १७ जुलै रोजी जिल्हा परिषदेच्या स्व. वसंतराव नाईक सभागृहात समुपदेशन पद्धतीने रिक्त जागांवर नियुक्ती दिली जाणार आहे. आॅनलाइन पद्धतीने आंतरजिल्हा बदली प्रक्रिया राबविण्यात आली. परजिल्ह्यातून वाशिम जिल्ह्यात बदलीवर येणारे २१३ शिक्षक बदलीस पात्र ठरले आहेत. यापैकी १४८ शिक्षक शिक्षण विभागात रुजू झाले. या शिक्षकांना शाळेतील रिक्त जागांवर पदस्थापना देण्यासाठी १७ जुलै रोजी जिल्हा परिषदेच्या सभागृहात समुपदेशन पद्धतीने प्रक्रिया राबविली जाणार आहे.- अंबादास मानकर, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) वाशिम.