शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

२१ गावांसाठी १.४२ कोटींचा निधी

By admin | Updated: August 1, 2014 02:18 IST

वाशिम जिल्ह्यातील २१ गावांसाठी शौचालयासंबंधी व नळजोडणीकरिता निधी मंजूर.

वाशिम : राज्य शासनाने ग्रामीण भागातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील कुटुंबांना खासगी नळजोडणी व वैयक्तिक शौचालय सुविधेसाठी १ कोटी ४२ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.महाराष्ट्र सुवर्ण महोत्सवी ग्रामीण दलित वस्ती पाणीपुरवठा व स्वच्छता योजना राबविण्याबाबत ग्रामपंचायतींना नळ जोडणी व वैयक्तिक शौचालयासाठी निधी मंजूर केला जातो. त्यानुसार वाशिम जिल्ह्यातील जवळपास २१ ठिकाणच्या शौचालयासंबंधी व नळजोडणीकरिता निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष सोनाली जोगदंड यांनी दिली. यामध्ये रिसोड तालुक्यातील शौचालय सुविधेसाठी केनवड येथे १0 लाख ९ हजार ८00 रुपये,वाशिम तालुक्यातील वाळकी जहाँगीर येथे ५ लाख ९४ हजार ६६0, धानोरा बु. ५ लाख ६१ हजार, खरोळा येथे ८ लाख ६३ हजार ९४0, केकतउमरा येथे ५ लाख २७ हजार ३४0, काटा येथे १९ लाख २९ हजार ८४0 रुपये, कोकलगाव येथे ५ लाख ६१ हजार रुपये, जुमडा येथे २ लाख ८0 हजार ५00 रुपये, मालेगाव तालुक्यातील अमानी येथे १४ लाख ३६ हजार १६0 रुपये, कारंजा तालुक्यातील पोहा येथे ८ लाख ६३ हजार ९४0 रुपये, लोणी अरब येथे ५ लाख ४९ हजार ७८0 रुपये, शेलूवाडा येथे ३ लाख १४ हजार १६0 रुपये, कारली येथे ६ लाख ५0 हजार ७६0, पिंप्री मोखड येथे ६ लाख ३९ हजार ५४0 रुपये, मानोरा तालुक्यातील अभयखेडा येथे ९ लाख ५३ हजार ७00 रुपये, हळदा येथे ७ लाख ६ हजार ८६0 रुपये, मंगरुळपीर तालुक्यातील चकवा येथे ४ लाख ६0 हजार २0 रुपये, तर नळजोडणीकरिता कवठळ येथे ७ लाख ७१ हजार १२0 रुपये, पारवा येथे २ लाख ३२ हजार ५६0 रुपये, सावरगाव कान्होबा येथे १ लाख ५५ हजार ४0 रुपये तर जोगलदरी येथे १ लाख ३८ हजार ७२0 रुपये निधी मंजूर झाला आहे. मंजूर झालेला निधी तत्काळ खर्ची करण्याबाबत संबंधीतांना आदेशीतही करण्यात आले आहे.