कारंजा : बारसनिमित्त गावातील एका भाविकाकडे जेवन केल्यानंतर १४ जणांना विषबाधा झाल्याची घटना १ एप्रिल रोजी तालुक्यातील वाई कारंजा येथे घडली. कारंजा तालुक्यातील वाई येथील एका भाविकाकडे बारसनिमित्त जेवनावळीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात गावातील ७0 पेक्षा अधिक जणांनी भोजन केले; परंतु यामधील १४ भाविकांना १ एप्रिलच्या दुपारी ४ वाजतापासून उलटी, संडास, डोकेदुखी, पोटदुखीला सुरूवात झाली. या रूग्णांनी गावातील डॉक्टरांकडून तात्पुरत्या स्वरूपात उपचार करून घेतला; मात्न मध्यरात्नीतून प्रकृती खालावल्याने गुरूवार (ता.२) रोजी सकाळी १४ रूग्णांना कारंजा ग्रामीण रूग्णालयात भरती करण्यात आले होते. यामध्ये सुशिला हरिदास मराठे, वैशाली वसंता देशपांडे, सीमा गोपाल मराठे, मंदा संतोष मराठे, शिवम देशपांडे, मंगलाताई देशपांडे, अनंता देशपांडे, गोपाल अंबादास ठाकरे, अंजुबाई गावंडे, गणेश सुरसे, भरत गावंडे, अरविंद नारायण ठाकरे, संतोष मराठे आदी रूग्णांचा समावेश होता. या सर्व रूग्णांवर कारंजा ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू असून, सर्व रूग्णांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकार्यांनी दिली .
वाई येथे १४ जणांना अन्नातून विषबाधा
By admin | Updated: April 3, 2015 02:34 IST