शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
4
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
5
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
6
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
7
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
8
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
9
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
10
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
11
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
12
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
13
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
14
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
15
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
16
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
17
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
18
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
19
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
20
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले

परराज्यातून कंटेनरने आलेला १३ लाखाचा गुटखा जप्त!

By admin | Updated: April 7, 2017 00:04 IST

वाशिम- परराज्यामधून मधुन अवैधपणे राज्यात आणला जाणारा १३ लाखांचा गुटखा शहर पोलीस स्टेशनमधील डिटेक्शन ब्रँच पथकाच्या हाती लागला.

दोन दिवसांतील दुसरी मोठी कारवाई : एलसीबीनंतर शहर पोलीसांना मिळाले यश वाशिम :  परराज्यामधून मधुन अवैधपणे राज्यात आणला जाणारा १३ लाखांचा गुटखा शहर पोलीस स्टेशनमधील डिटेक्शन ब्रँच पथकाच्या हाती लागला. सदर गुटख्याचा शोध ५ एप्रिलच्या मध्यरात्रीनंतर  लागला. परराज्यामधून कंटेनरचा वापर करून त्यामधे अवैधपणे गुटख्याची वाहतूक करून राज्यामधील गुटखा किंगला पुरवठा होत असल्याची माहिती शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सी.ए. कदम यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस अधिक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलीस अधिक्षक स्वप्ना गोरे व उपविभागीय अधिकारी जयकुमार चक्रे यांच्या मार्गदर्शनात डि.बी. पथकाचे सहाय्यक पोलीस निरिक्षक रमेश जायभाये, राजेश बायस्कर, ज्ञानेश्वर म्हात्रे, सतिष गुळदे, गजानन कऱ्हाळे यांच्या पथकाने बाहेती हॉस्पिटल नजीक सापळा रचला होता. डी.बी. पथकाने संशयीत ट्रकला थांबवून थांबवून तपासणी करण्यासाठी वाशिम शहर पोलीस स्टेशनमध्ये ट्रक उभा केला. या लांबलचक कंटेनरमध्ये (अंदाजे ४० फुट लांबी) वजनदार पार्सल भरलेले होते. कंटेनरमधील सर्व माल उतरविण्यासाठी तब्बल सहा ते सात तासाचा कालावधी लागला. अखेर सर्वात शेवटच्या टप्प्यात अतिशय गुप्त पध्दतीने दडवलेल्या गुटख्याचे तब्बल ५२ पोते पोलीसांच्या हाती लागले. तत्पुर्वी उपस्थित असलेल्या अन्न औषध प्रशासन अधिकारी व मिडीयाच्या प्रतिनिधींना ट्रकमध्ये अवैध वस्तू आढळून येईल याची काहीच शास्वती नव्हती. परंतू पोलीसांनी आपले प्रयत्न रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवले असता त्यांना अखेर गुटख्याचे ह्यरॉ मटेरीयलह्ण हाती लागले. सदर घटनेची माहिती शहर पोलीसांनी अकोला येथील अन्न व औषध विभागाचे अधिकारी अजिंठेकर यांना दिली. अजिंठेकर यांनी ६ एप्रिल रोजी दुपारी १ वाजताचे सुमारास घटनास्थळाचा पंचनामा करून गुटख्यासाठी वापरण्यात येणारा कच्चा माल  (अंदाजे किंमत २३ लाख) व ट्रक (अंदाजे किंमत २० लाख) रितसर जप्त केला. या सर्व मुद्देमालाची अंदाजे किंमत ४३ लाख आहे. ट्रकचालकाला अटक केली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.