शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

१,२८९ विद्यार्थ्यांची जातपडताळणी खोळंबळी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 20:05 IST

वाशिम: जिल्ह्यात होऊ घातलेल्या २७३ ग्रामपंचायत निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर आरक्षीत जागांवर निवडणूक लढविणाºया  विविध प्रवर्गातील १२०० उमेदवारांनी जात पडताळणीसाठी अर्ज दाखल केले आहेत.  यामुळे अर्ज संख्येत वाढ होऊन विद्यार्थ्यांच्या जात पडताळणीचे अर्ज निकाली काढण्यात खोळंबा निर्माण झाला असून, सद्यस्थितीत १ हजार २८९ विद्यार्थ्यांचे अर्ज गेल्या दोन महिन्यांपासून समाज कल्याण विभागाच्या जातवैधता समितीकडे प्रलंबित असल्याचे कळले आहे. 

ठळक मुद्देजिल्ह्यातील वास्तवग्रामपंचायत निवडणुकीमुळे अर्जांत वाढ 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात होऊ घातलेल्या २७३ ग्रामपंचायत निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर आरक्षीत जागांवर निवडणूक लढविणाºया  विविध प्रवर्गातील १२०० उमेदवारांनी जात पडताळणीसाठी अर्ज दाखल केले आहेत.  यामुळे अर्ज संख्येत वाढ होऊन विद्यार्थ्यांच्या जात पडताळणीचे अर्ज निकाली काढण्यात खोळंबा निर्माण झाला असून, सद्यस्थितीत १ हजार २८९ विद्यार्थ्यांचे अर्ज गेल्या दोन महिन्यांपासून समाज कल्याण विभागाच्या जातवैधता समितीकडे प्रलंबित असल्याचे कळले आहे. जिल्हा निर्मितीपासून जिल्हावासींना अकोला येथील समाजकल्याण विभागातून जात वैधता प्रमाणपत्र देण्यात येत होते. त्यामुळे मागासवर्गियांना कार्यालयाचे खेटे खावे लागत होते. यावर उपाय म्हणून वाशिम जिल्ह्यात २२ नोव्हेंबर २०१६ पासून स्वतंत्र जात वैधता समिती नेमण्यात आली. मात्र, पुरेशा मनुष्यबळाचा अभाव आणि जातवैधता प्रमाणपत्रामागील किचकट प्रणालीमुळे जिल्ह्यातही पूर्वीची स्थिती कायम आहे. त्यातच जिल्ह्यात होऊ घातलेल्या २७३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी विविध आरक्षीत जागांवर निवडणूक लढविणाºया १ हजार २०० उमेदवारांनी जातपडताळणीसाठी अर्ज सादर केल्याने अर्जांची संख्या वाढून विद्यार्थ्यांची १ हजार २८९ प्रकरणे रखडून पडली आहेत. दरम्यान, विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी हेलपाटे मारावे लागतात. यापृष्ठभूमिवर मंगळवारी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) नियम - २०१२ मध्ये सुधारणा करण्यासही मान्यता देण्यात आली. त्यानुसार कमी वेळेत आणि सुलभपणे प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्जदाराने आपल्या वडिलांकडील रक्तनाते संबंधातील जात वैधता प्रमाणपत्रासह आपला अर्ज जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सादर करणे आवश्यक राहणार आहे. त्यानंतर त्यावर आक्षेप मागवून तातडीने अर्ज निकाली काढण्यात येईल, असा दावा शासनाने केला आहे. त्यामुळे शासनाच्या नवीन निर्णयाच्या अंमलबजावणीची प्रतीक्षा लागली आहे.