शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
2
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!
3
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'
4
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
5
आव्हान स्वीकारले! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत जाहीर चर्चेला राहुल गांधी तयार
6
“शरद पवार, उद्धव ठाकरे यांना आमिष दाखविण्याचा मोदींचा प्रयत्न”; काँग्रेसचा आरोप 
7
बुलेट्स कसाबच्या नव्हत्या तर कोणाच्या? प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना खडा सवाल
8
तीन टप्प्यांत कोणत्या पक्षाने घेतल्या सर्वाधिक सभा? मोदी, शाह, राहुल यांचा झंझावाती प्रचार
9
“मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील अन् कार्यकाळही पूर्ण करतील”; पंतप्रधानपदासाठी वयाची अट नाही
10
सर्जिकल अन् हवाई हल्ले करण्याची हिंमत काँग्रेस पक्षामध्ये नाही, पाकच्या गोळीला...: अमित शाह
11
श्रीरामाच्या नावाने सत्ता उपभोगणाऱ्यांच्या काळातच जनतेवर सर्वाधिक अन्याय: प्रियंका गांधी
12
भाजपा सत्तेत आल्यास अमित शाह पंतप्रधान होतील; अरविंद केजरीवाल यांची भविष्यवाणी
13
कोलकाता नाईट रायडर्स प्ले ऑफमध्ये! मुंबई इंडियन्सने हातचा सामना गमावला 
14
जरांगेंसोबतच्या भेटीत काय घडलं?; बीडमधील सांगता सभेत शरद पवारांनी प्रथमच सविस्तरपणे सांगितलं!
15
राज्यातील 11 जागांवरील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, पंकजा मुंडेंसह या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
16
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
17
कोलकाताने १६ षटकांत मुंबईसमोर आव्हान उभे केले; बुमराहच्या यॉर्करने सर्वांना चकित केले
18
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
19
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
20
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   

१२ गावांचे टँकर प्रस्ताव लालफितशाहीत !

By admin | Published: May 27, 2017 7:48 PM

गतवर्षी २२ गावांत टँकरने होता पाणीपुरवठा : यावर्षी एकाही गावात टँकरने पाणीपुरवठा नाही, दिरंगाईचा फटका.

मंगरूळपीर : गतवर्षी टँकरग्रस्त असलेल्या २२ गावांपैकी जवळपास १९ गावांत यावर्षीही पाणीटंचाई जाणवत आहे. यापैकी १२ गावांनी टँकरचे प्रस्ताव सादर केल्यानंतरही अद्याप या प्रस्तावांना मंजुरात मिळालेली नाही. केवळ तीन गावांत विहिर अधिग्रहण करण्यात आले आहे.उन्हाळ्याला सुरूवात झाली की टंचाईग्रस्त गावांत पाणीटंचाईची दाहकता वाढते. मंगरूळपीर तालुक्यातही पाणीटंचाईने काही गावांना होरपळून जावे लागते. गतवर्षी तालुक्यातील इचोरी, भूर, कळंबा बोडखे, सोनखास, शहापूर खु., मोझरी, तऱ्हाळा, बिटोडा भोयर, कासोळा, झाडगाव, पांग्री महादेव, अरक, घोटा, पोघात, शिवणी रोड, रामगढ, नांदगाव, लही, मोहगव्हाण, बेलखेड, बालदेव, सायखेडा अशा २२ गावांत तिव्र पाणीेटंचाई निर्माण झाली होती. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपरोक्त २२ गावांत टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला होता. यावर्षी तालुक्यातील एकाही गावात अद्यापपर्यंत टँकर सुरू झाले नाही. तथापि, टँकरची आवश्यकता असल्याबाबतचे प्रस्ताव, गतवर्षी टँकरग्रस्त असलेल्या १२ गावांनी दिलेले आहेत. मात्र, एकाही ठिकाणी टँकर सुरू झाले नाही. गतवर्षी टँकरग्रस्त असलेल्या कळंबा बोडखे, शहापूर खु., सोनखास, बालदेव, तऱ्हाळा, पांग्री महादेव, कासोळा, घोटा, मोझरी, वसंतवाडी, दाभा, सायखेडा आदी १२ गावांत सद्यस्थितीत तीव्र पाणीटंचाई निर्माण झालेली आहे. येथे टँकरने पाणीपुरवठा करावा, असे प्रस्ताव दिलेले आहेत. असे असतानाही प्रशासन टँकरने पाणीपुरवठा का करीत नाही? असा सवाल तेथील जनतेने उपस्थित केला आहे. पाणीटंचाई असतानाही, टँकर सुरू न केल्याने पाणीटंचाई दूर झाल्याबद््दल धूळफेक तर केली जात नाही ना? अशी शंका उपस्थित होत आहे. गतवर्षी टँकर सुरू असलेल्या पोघात, भूर, शिवनी या तीन गावांत यावर्षीदेखील पाणीेटंचाई असल्याने येथे टँकर सुरू न करता विहिर अधिग्रहण करण्यात आले आहे. या तीन गावांत विहिर अधिग्रहण करून पाणीटंचाईची धग कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. गतवर्षी टँकरग्रस्त असलेल्या जांब, बेलखेड, पांग्री महादेव, तऱ्हाळा, दाभा यासह सर्वच गावातील नागरिकांना यावर्षीदेखील दूरवरून पाणी आणावे लागत आहे. कळंबा बोडखे येथील नागरिकांना दूरवरून पाणी आणून तहान भागवावी लागत आहे. शहापूर खु., सोनखास गावात जलस्त्रोत नसल्याने आणि टँकरने पाणीपुरवठा नसल्याने घोटभर पाण्यासाठी नागरिकांना मैलभर भटकंती करण्याची वेळ आली आहे. तालुक्यात यावर्षी मे महिना संपत आला तरी पाणीटंचाई निवारणार्थ उपाययोजनांवर प्रभावी अंमलबजावणी झाली नसल्याचे दिसून येते. यावर्षी लाठी, चांभई, धानोरा, हिरंगी, भुर, जनुना, पारवा, पोटी,  शिवनी, मजलापुर, चेहेल, पोघात, धोत्रा, साळंबी, भडकुंभा, चिखली आदी गावांत विहिर अधिग्रहण करण्यात आले आहे. गतवर्षी २२ गावांतील टँकरवर ८७.७१ कोटींचा खर्च गतवर्षी मंगरूळपीर तालुक्यातील इचोरी, भूर, कळंबा बोडखे, सोनखास, शहापूर खु., मोझरी, तऱ्हाळा, बिटोडा भोयर, कासोळा, झाडगाव, पांग्री महादेव, अरक, घोटा, पोघात, शिवणी रोड, रामगढ, नांदगाव, लही, मोहगव्हाण, बेलखेड, बालदेव, सायखेडा अशा २२ गावांत टँकरने पाणीपुरवठा सुरू होता. यावर ८७ कोटी ७१ लाख रुपयांचा खर्च झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाच्या दप्तरी आहे.यावर्षी १२ गावांचे टँकरसाठी प्रस्तावगतवर्षी टँकरने पाणीपुरवठा सुरू असलेल्या २२ गावांपैकी यावर्षी १२ गावांनी टँकरचे प्रस्ताव सादर केले आहेत. यामध्ये कळंबा बोडखे, शहापूर खु., सोनखास, बालदेव, तऱ्हाळा, पांग्री महादेव, कासोळा, घोटा, मोझरी, वसंतवाडी, दाभा, सायखेडा या १२ गावांचा समावेश आहे. मात्र, अद्याप टँकरने पाणीपुरवठा सुरू न झाल्याने तेथे पाणीटंचाई जाणवत आहे.

शहापूर, सोनखास येथील पाणीटंचाई लक्षात घेवुन मागील महिन्यात टँकरसाठी प्रस्ताव तहसील कार्यालयात पाठविला आहे. मात्र या प्रस्तावाची अद्यापपर्यंत दखल न घेतल्यामुळे ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. ही समस्या लक्षात घेवुन लवकर टँकर सुरु करणे अपेक्षी आहे. - रेखा गजानन नाईक सरपंच, जांब गटग्रामपंचायतबेलखेड येथे गतवर्षी टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. यावर्षी पाणीटंचाई भेडसावत आहे. गावातील काही जलस्त्रोतातील पाण्याचा वापर करून पाणीटंचाईवर मात करण्याचा प्रयत्न सुरू आहे. गावातील एकाही विहिरीला मुबलक पाणी नसल्यामुळे विहिर अधिग्रहण करणे शक्य नाही. त्यामुळे टँकरने पाणीपुरवठा करणे गरजेचे आहे.- सुरेखा ठाकरे,सरपंच, बेलखेड ग्राम पंचायतने चिखलगाड येथील पाणीटंचाईची समस्या लक्षात घेवुन याबाबतचा प्रस्ताव पंचायत समिती कार्यालयास सादर केला आहे. परंतु अद्याप याबाबत आदेश प्राप्त नाहीत.- एस.एम.शिंदे, सचिव चिखलागडयावर्षी पाणीटंचाई असतानाही टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला नाही. पाण्याचा काटकसरीने वापर सुरू आहे. राजू ठोंबरे, नागरिक, बेलखेड.