शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

प्रचाराचे ‘१२ दिवस’!

By admin | Updated: September 15, 2014 00:32 IST

वाशिम जिल्ह्यातील मतदारसंघांची व्याप्ती मोठी: उमेदवारांना ठेवावे लागणार होऊ दे खर्चाचे धोरण

वाशिम : अख्या महाराष्ट्राला उत्कंठा लागलेल्या विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम १२ सप्टेंबरला घोषीत झाला अन् जिल्ह्यातील मंदावलेल्या राजकीय घडामोडींनी गती पकडली. महायुती व आघाडी यापैकी कुणीच अद्याप उमेदवार जाहीर केले नसले तरी सर्वपक्षीय इच्छूक आपल्यालाच उमेदवारी मिळते या तोर्‍यात कामाला लागले आहेत. मात्र निवडणयूक आयोगाने प्रचारसाठी उपलब्ध करून दिलेल्या कमी कालावधीमुळे सद्या या संभाव्य उमेदवारांनी धडकी घेतली आहे. मतदार संघाची व्याप्ती व मतदार तथा कार्यकर्त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणे प्रचाराच्या १२ दिवसात शक्य करताना उमेदवारांची दमछाक होणार आहे. मात्र, यावर मात करण्यासाठी उमेदवारांनी रणणिती आखली असल्याचे दिसून येत आहे.सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम सर्वसाधारणपणे ४५ दिवसांचा असतो; पण गणेशोत्सव, दसरा व दिवाळी या महत्त्वाच्या सणात निवडणुकीची कोणतीही प्रक्रिया येऊ नये याची काळजी घेत निवडणूणक आयोगाने विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम ४0 दिवसांवर आणला आहे. १२ सप्टेंबर पासून सुरू झालेल्या निवडणूक कार्यक्रमांची सांगता २२ ऑक्टोंबरला होणार आहे. यामध्ये १ ऑक्टोंबर नामांकन माघारीचा अखेरचा दिवस आहे. प्रत्यक्ष मतदानाच्या ४८ तासांपूर्वी प्रचार तोफा शांत होत असल्याने उमेदवारांना प्रत्यक्ष प्रचारासाठी केवळ १२ दिवसांचा कालावधी मिळणार आहे.जिल्ह्यात विधानसभेचे तिन मतदार संघ आहेत. त्यापैकी वाशिम मतदार संघात वाशिम व मंगरूळपीर तालुक्यातील २६८ गावांचा समावेश आहे. कारंजा मतदार संघात कारंजा व मानोरा तालुक्यातील ३0३ तर रिसोड मतदार संघात रिसोड व मालेगाव तालुक्यातील १९८ गावे समाविष्ट आहेत. काही उमेदवारांनी यापूर्वीच तयारी केली असली तरी नवख्या उमेदवारांना मात्र मतदारांपयर्ंत पोचताना कसरत करावी लागणार आहे. प्रचारासाठी कमी कालावधी असल्यामुळे प्रस्थापित राजकारण्यांनाही मतदारांच्या गाठीभेटी घेण्यात अडचणी निर्माण होणार आहेत. प्रचाराला मिळणारा अल्प वेळ व मतदार संघाची व्याप्ती पाहता काही मतदारांनी सोशल मिडीयाचा आधार घेत प्रचाराचा धुराळा उडविण्याची तयारी केली आहे. यासाठी वॉटसअप, फेसबुकव्हाईस कॉल या हायटेकप्रणालीचा वापरही होऊ शकतो. ** उमेदवारांची कसरतच वाशिम विधानसभा मतदार संघात वाशिम सह मंगरूळपीर तालुक्यातील २६८ गावांचा समावेश आहे. येथे कॉग्रेस व भाजपमध्ये इच्छूकांची भाऊगर्दी झालेली दिसून येत आहे. मात्र, अद्याप कुणीच उमेदवारी घोषीत केली नसल्यामुळे वातावरण शांत दिसून येत आहे.वाशिम मतदार संघाची व्याप्ती पाहता येथे १२ दिवसात प्रचार करताना सर्वपक्षीय उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांचा चांगलाच कस लागणार असल्याचे चित्र दिसून येत आहे** जिल्ह्यातील सर्वात मोठा मतदारसंघकारंजा मतदार संघात कारंजा व मानोरा तालुक्यातील ३0३ गावांचा समोवश आहे. कांरजा तालुका विकसनशील असला तरी मानोरा तालुक्याची ओळख दुर्गम व अविकसीत म्हणूनच आहे. तालुक्यातील काही गावे अद्यापही पक्या रस्त्यांनी जोडलेली नाहीत. त्यामुळे १२ दिवसात प्रत्येक गावात पोहोचून प्रचार करणे उमेदवारांसाठी शक्य दिसत नाही. ** सेमीफायनल संपली मात्र..मालेगाव व रिसोड तालुक्याचा समावेश असलेल्या रिसोड विधानसभा मतदार संघामध्ये दोन महिन्यापूर्वीच विधानसभेची पोटनिवडणूक पार पडली होती. सदर निवडणूक दोन्ही पक्षासाठी सेमी फायनल होती. तेव्हापासून या मतदार संघातील राजकीय वारे शांतच झाले नाहीत. त्यामुळे यावेळी उमेदवारांना पुन्हा कसरत करावी लागणार आहे. कमी कालावधी व कसरत अधिक असेच येथील चित्र राहणार असल्याचे दिसून येणार आहे. यावर उमेदवार कसे मात करतात हे औत्सुक्याचे ठरणार आहे