शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती विभागातील ११७ कायम विनाअनुदानित शाळा अनुदानासाठी पात्र

By admin | Updated: June 19, 2015 02:28 IST

३५१ वर्ग, ५८१ शिक्षक व ४९२ शिक्षकेतर कर्मचारी २0 टक्के अनुदानासाठी पात्र.

अकोला- अमरावती विभागातील ११७ शाळांमधील कायम विनाअनुदानित हा शब्द वगळल्यानंतर या शाळा अनुदानासाठी पात्र ठरविण्यात आल्या आहेत. त्यानुसार ३५१ वर्ग, ५८१ शिक्षक व ४९२ शिक्षकेतर कर्मचार्‍यांना २0 टक्के अनुदानास पात्र ठरविण्याचा आदेश गुरुवारी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने दिला. राज्यात २00१ नंतर शाळांना कायम विनाअनुदानित तत्त्वावर मान्यता दिली जात होती. २४ नोव्हेंबर २00१ च्या आदेशानुसार राज्यात २ हजार माध्यमिक व २ हजार प्राथमिक शाळांना कायम विनाअनुदानित तत्त्वावर मान्यता देण्यात आली होती. या शाळांना अनुदान लागू करण्याची मागणी सातत्याने होत होती. शाळा व्यवस्थापन आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी यासाठी आंदोलनेही केली होती. त्यानुसार काँग्रेस आघाडी सरकारने कायम विनाअनुदानित शाळांमधील ह्यकायमह्ण शब्द काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता. २0१२-१३ पासून मूल्यांकनाचे सुधारित निकष जाहीर करून या शाळांनाही अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार प्राप्त प्रस्तावांची छाननी करून अनुदानास पात्र ठरलेल्या शाळांना अनुदान देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे अकोला जिल्हा दौर्‍यावर असताना त्यांनी अमरावती विभागातील ११७ शाळांना अनुदानास पात्र ठरविण्यात येत असल्याचे जाहीर केले होते. त्यांचे घोषणेनुसार गुरुवारी शालेय शिक्षण विभागाने अनुदानास पात्र ठरलेल्या ११७ शाळांची यादी जाहीर केली आहे. पाचही जिलतील ११७ शाळांमधील ३५१ वर्गांना मान्यता देण्यात आली आहे. या शाळांसाठी ५८१ मुख्याध्यापक व प्रशिक्षित शिक्षकांना अनुदानास पात्र ठरविण्यात आले आहे. याशिवाय ४९२ शिक्षकेतर कर्मचार्‍यांचाही त्यात समावेश आहे. या शाळा २0१३-१४ पासून २0 टक्के अनुदानास पात्र ठरल्या आहेत.