शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका
3
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
4
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
5
तानाजी गळगुंडेला 'सैराट'साठी मिळालेलं इतक्या हजार रुपयांचं मानधन, स्वतःवर खर्च न करता दिले मित्राला
6
पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना! पत्नीच्या नावावर FD करुन मिळवा बँक एफडीपेक्षा जास्त परतावा!
7
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
8
Share Market Update: सेन्सेक्स २५७ आणि निफ्टी ९९ अंकांच्या तेजीसह सुरुवात; तेजीसह उघडले हे स्टॉक्स?
9
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
10
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 
11
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
12
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
13
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
14
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
15
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
16
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
17
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
18
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
19
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
20
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा

२५ टक्के मोफत प्रवेशासाठी ११२३ अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:42 IST

शालेय शिक्षण विभागाच्या २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेंतर्गत नोंदणीसाठी शाळांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्‍याने शिक्षण विभागाने ही नोंदणी प्रक्रिया ...

शालेय शिक्षण विभागाच्या २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेंतर्गत नोंदणीसाठी शाळांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्‍याने शिक्षण विभागाने ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दोन वेळा मुदतवाढ दिलेली होती. ही वाढीव मुदत मंगळवार२४ फेब्रुवारीला संपली. यामध्ये वाशिम जिल्ह्यातील१०३ शाळांनी नोंदणी पूर्ण केलेली आहे. यामध्ये कारंजा तालुक्यातील १६, मालेगाव तालुक्यातील १७, मंगरुळपीर तालुक्यातील १७, मानोरा तालुक्यातील ७, रिसोड तालुक्यातील १८, तर वाशिम तालुक्यातील २८ शाळांचा समावेश आहे. या सर्व शाळांत मिळून २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेंतर्गत ७१८ जागा भरावयाच्या आहेत. या जागांकरीता ऑनलाईन अर्ज क रण्यासाठी ३ मार्चपासून सुरुवात झाली आहेत. या अर्ज प्रक्रियेसाठी ३० मार्च २०२१ ही अंतीम मुदत देण्यात आली होती. या मुदतीपर्यंत ११२३ विद्यार्थ्यांच्या पालकांनी अर्ज केले आहेत.

------------

आता लक्ष लॉटरी प्रक्रियेकडे

२५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेंतर्गत जिल्ह्यातील १०३ शाळांची नोंदणी झाली असून, या शाळांत २५ टक्के मोफत प्रवेशासाठी ३० मार्च रोजीच्या अंतीम मुदतीपर्यंत ११२३ विद्यार्थ्यांच्या पालकांनी अर्ज सादर केले असून, आता या प्रवेश प्रक्रियेत निवडीसाठी होणाºया लॉटरी प्रक्रियेकडे पालकांचे लक्ष लागले आहे.

------------

कोट: आरटीईच्या २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेतंर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशाकरीता ऑनलाईन अर्ज प्रक्रि येस बुधवार ३ मार्चपासून सुरुवात झाली होती. या अर्ज प्रक्रियेसाठी ठरवून दिलेल्या ३० मार्च रोजीच्या अंतिम मुदतीपर्यंत ११२३ विद्यार्थ्यांच्या प्रवेशाकरीता पालकांनी अर्ज केले आहेत.

- अंबादास मानकर,

शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि.प. वाशिम