लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्ह्यात प्रभावीपणे ह्यगुड मॉर्निंंंंगह्ण मोहीम राबविण्यात येत आहे. वाशिम पंचायत समिती अंतर्गत येणार्या अनसिंग, उकळीपेन, पिंपळगाव, एकांबा आणि सुकळी या गावात ही मोहीम अधिक कडक करण्यात आली असून, २0 व २१ जून रोजी राबविण्यात आलेल्या मोहिमेदरम्यान उघड्यावर जाणार्या १७ लोकांकडून प्रत्येकी १२00 रुपये दंड वसूल करण्यात आला; तर दंड न भरणार्या ९ आणि शासकीय कामात अडथळा आणणार्या २ अशा ११ लोकांवर कलम ३५३ नुसार फौजदारी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
उघड्यावर जाणा-या ११ जणांवर गुन्हा!
By admin | Updated: June 22, 2017 04:19 IST