शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळयातही ११ दिवसाआड पाणी

By admin | Updated: July 1, 2016 01:14 IST

वाशिम येथे नगरसेवकांसह सामाजिक संघटनेनी सुरु केलेले टँकर झाले बंद.

वाशिम : वाशिम शहराला पाणी पुरवठा करण्यात येत असलेल्या एकबुर्जी प्रकल्पात मृत पाणी साठा असल्याने नागरिकांना ११ दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे. यामुळे नागरिकांकडे पाहिजे त्या प्रमाणात पाणी साठवण क्षमता नसल्याने अनेक समस्यांच्या सामोरे जावे लागत आहे. ३0 जून रोजी शहरात बर्‍यापैकी पाऊस झाल्याने पाणी टंचाई दूर होण्याची शक्यता वर्तविल्या जात आहे. वाशिम शहरात एप्रिल महिन्यापासूनच पाणी टंचाई जाणविण्यास प्रारंभ झाला. पाणी टंचाई दिवसेंदिवस उग्ररुप धारण करीत असल्याने शहरातील काही नगरसेवक, समाजसेवकांनी मोफत टँकरव्दारे पाण्ी पुरवठा सुरु केला. जून महिन्याच्या दुसर्‍या आठवडयापर्यंत शहराला यांच्यातर्फे पाणी देण्यात आल्ो. त्यानंतर अनेकांनी टँकरबंद केल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. वाशिम नगरपरिषदेच्यावतिने सुरुवातीला दररोज २४ तास पाणी पुरवठा केला. जसजसे पाण्याची पातळी खालावत गेली तशीतशी पाणी देण्याच्या दिवसामध्ये वाढ करण्यात आली. सुरुवातीला दररोज नंतर दोन दिवसाआड त्यानंतर तीन दिवसाआड, पाण्ीा पुरवठा करण्यात आला. पाण्याची पातळी दिवसेंदिवस घटत असल्याने सहा दिवसाआड तर आता अकरा दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे. या संदर्भात नगरपरिषद पाणी विभागाशी संपर्क साधला असता २९ व ३0 जून रोजी झालेल्या पावसाने पाणी पातळीत पाहिजे तशी वाढ झालेली नाही. त्यामुळे जसजशी पाणी पातळीत वाढ होईल तसतसे पाणी पुरवठा करण्याचे दिवस कमी होतील. सद्या काही भागात ८ दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे. एकबुर्जी प्रकल्पात पाणी साठा निर्माण झाल्यावर दोन ते तीन दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येईल. सद्यास्थितीत शहरातील अनेक भागात अकरा दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत असल्याने नागरिकांना मात्र पावसाळयातही पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.