शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
6
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
7
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
8
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
9
आयोग नव्हे, मतदारच राजा !
10
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
11
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
12
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
13
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
14
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
15
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
16
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
17
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
18
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
19
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
20
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!

सुधारित प्रशासकीय मान्यतेअभावी रखडले १0 सिंचन प्रकल्प

By admin | Updated: July 31, 2014 02:09 IST

अकोला, वाशिम व बुलडाणा जिल्ह्यातील दहा सिंचन प्रकल्पांची कामे तब्बल दीड वर्षांपासून रखडली आहेत.

संतोष येलकर / अकोलापाटबंधारे विभागाच्या अकोला मंडळातील अकोला, वाशिम व बुलडाणा या तीन जिल्ह्यातील दहा सिंचन प्रकल्पांची कामे, सुधारित प्रशासकीय मान्यतेअभावी तब्बल दीड वर्षांपासून रखडली आहेत. सिंचनाचा मोठा अनुशेष असलेल्या भागातील प्रकल्पांसंदर्भातील शासनाची ही अनास्था, विदर्भ विकासाप्रतीच्या शासनाच्या प्रतिबद्धतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत.विदर्भातील सिंचनाच्या अनुशेषासंदर्भात प्रचंड ओरड झाल्यानंतर, विदर्भातील विविध जिल्ह्यांमध्ये सिंचनाचे क्षेत्र वाढविण्याकरिता सिंचन प्रकल्पांच्या कामांना प्राधान्य दिले जात असून, निधीदेखिल उपलब्ध करुन दिला जात आहे. पाटबंधारे विभागाच्या अकोला मंडळांतर्गत येणार्‍या अकोला, वाशिम आणि बुलडाणा या तीन जिल्ह्यांमध्ये विविध सिंचन प्रकल्पांची कामे सुरु करण्यात आली आहेत; मात्र सुधारित प्रशासकीय प्रशासकीय मान्यता मिळाली नसल्याने, या तीनही जिल्ह्यातील दहा सिंचन प्रकल्पांची कामे गेल्या दीड वर्षांपासून ठप्प झाली आहेत. तब्बल ६,९८३ हेक्टर सिंचन क्षमता असलेल्या या दहा सिंचन प्रकल्पांच्या कामांसाठी ३९२ कोटी ५९ लाखांचा निधी मंजूर झालेला असला तरी, शासनाकडून सुधारित प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली नसल्याने, या सिंचन प्रकल्पांची कामे रखडली आहेत. त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील चार आणि वाशिम व बुलडाणा जिल्ह्यातील प्रत्येकी तीन सिंचन प्रकल्पांचा समावेश आहे. पाटबंधारे विभागाच्या अकोला मंडळांतर्गत, अकोला, बुलडाणा व वाशिम या तीन जिल्ह्यातील दहा सिंचन प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता मिळणे बाकी आहे. शासनाकडून लवकरच या सिंचन प्रकल्पांच्या कामांसाठी सुधारित प्रशासकीय मान्यता प्राप्त होणार आहे. सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर सिंचन प्रकल्पांची कामे मार्गी लागतील, असे पाटबंधारे विभागाचेप्रभारी अधीक्षक अभियंता ए. एन. परातेयांनी सांगीतले.सुधारित प्रशासकीय मान्यतेअभावी रखडलेले १0 प्रकल्प!अकोला जिल्हा शहापूर लघु पाटबंधारे योजना                १३७३१४६ कोटीकवठा-शेलू ल.पा.योजना                         २८५१0 कोटीवाई ल.पा.योजना                                १0३६ ९३ कोटीपोपटखेड ल.पा.योजना                          १00६६४ कोटीवाशिम सुरखंडी ल.पा. योजना                           ४२५१२ कोटी कुत्तरडोह ल.पा.योजना                         ३७९१७ कोटी धारपिंप्री ल.पा.योजना                           २७१0८ कोटीबुलडाणा लोणवळी ल.पा.योजना                            २७४१२ कोटीदिग्रस कोल्हापूरी बंधारा                        ६0६0६ कोटी ५९ लाखबोरखेडी ल.पा.योजना                                १३0८२४ कोटीएकूण                                         ६९६३ ३९२ कोटी ५९ लाख