शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

जि.प. शाळांतील विद्यार्थ्यांची आबाळ

By admin | Updated: June 27, 2016 02:42 IST

तालुक्यात एकूण २३७ जिल्हा परिषद मराठी शाळा कार्यरत आहेत़ त्यामध्ये जवळपास २४ हजारांच्या आसपास विद्यार्थी शिक्षण घेत असतात

राहुल वाडेकर,

विक्रमगड- विक्रमगड तालुक्यात एकूण २३७ जिल्हा परिषद मराठी शाळा कार्यरत आहेत़ त्यामध्ये जवळपास २४ हजारांच्या आसपास विद्यार्थी शिक्षण घेत असतात. विद्यार्थ्यांची गळती थांबली जावी,त्यांना शिक्षणाची गोडी लागावी आणि या प्रक्रियेतून विदयार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावला जावा,यासाठी शासनाकडून लाखो रुपये निधी दिला जातो़ तसेच विद्यार्थ्यांची १०० टक्के पटनोंदणी करण्यासाठी शासनाकडून विदयार्थ्यांना गणवेश, पाठयपुस्तके व शाळेमध्ये पोषण आहराची व्यवस्था केली गेली आहे़ मात्र शाळा सुरु होऊनही आज ११ दिवस उलटून गेले असतांनाही विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरविण्यात आलेला नाही़ सद्यस्थित शाळांवरील शिक्षण आपल्या खिशातून पदरमोड करुन साहित्य विकत आणून आहार देत आहेत़परंतु हे किती दिवस चालणार शाळा सुरु होतांच पोषण आहाराची सामुग्री देणे आवश्यक होते. पण ते झालेले नाही. ज्या ठिकाणी केंद्र शाळा आहेत़ त्यामध्ये पहिली ते ८ वी पर्यतच्या वर्गात जवळ जवळ ४०० ते ४५० विदयार्थी असतात़ एवढया मोठया विदयार्थ्यांना लागणाऱ्या पोषण आहाराचेसाहित्य खरेदी करीतांना येथील शिक्षकांना मोठी करसरतच करावी लागते आहे़ त्यातच शिक्षकांचे पगार महिन्याला वेळेत होत नसल्याची अडचण आहे़ त्यामुळे रोज पोषण आहार पुरविण्यासाठी लागणारे साहित्य घेण्याकरीता शिक्षकांना उसनवारी करावी लागत आहे़ ही संपूर्ण जबाबदारी येथील गट शिक्षणाधिकाऱ्यांची असून त्यांनी पोषण आहार सामग्रीसाठी निधीची तरतूद करणे गरजेचे आहे़ मात्र ते सारी जबाबदारी शिक्षकांवर टाकून मोकळे झाले आहेत़ त्यामुळे यामध्ये मरण होते ते शिक्षकांचे काही शाळा या खुप अडचणींच्या ठिकाणी व दुरवर असल्याने तेथे वाहतुकीची सोय नसल्याने तेथे े साहित्य नेणे देखील जिकिरीचे होत आहे़ शाळेवर पोषण आहार पुरवितांना शिक्षकांना आपल्या खिशाला चाट द्यावी लागत असल्याने त्यांच्यामधून नाराजीचा सूर उमटत आहे़ >अदयापही शासनाने शाळांना निधी दिलेला नसल्याने विदयार्थ्यानां पोषण आहार पुरविण्याची जबाबदारी शिक्षकांवर आली आहे. अगोदर वेळेत पगार नाही व आता पोषण आहारासाठी पैसे तरी कुठून आणावयाचे हा प्रश्न आहे.- संजय तुकाराम आयरे, नेते शिक्षक संघटना विक्रमगड.