शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

विरार हत्याकांडातील आरोपी जेरबंद, चेंबर चोकोप झाल्याने दुर्गंधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 01:17 IST

विरार पश्चिमेकडील ग्लोबल सिटी येथे एका इमारतीच्या ड्रेनेज चेंबरमध्ये मानवी मृतदेहाचे तुकडे आढळल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली.

वसई : विरार पश्चिमेकडील ग्लोबल सिटी येथे एका इमारतीच्या ड्रेनेज चेंबरमध्ये मानवी मृतदेहाचे तुकडे आढळल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. या प्रकरणी अर्नाळा सागरी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत तपासाला सुरु वात केली. या प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून, आपल्या मित्राची हत्या आर्थिक देवाणघेवाणीतून केली असल्याचे आरोपीने सांगितले आहे.विरार पश्चिमेला असणाऱ्या ग्लोबल सिटीतील बछराज पॅरडाइज सोसायटीच्या ‘सी’ विंगच्या ड्रेनेज चेंबरमध्ये मृतदेहाचे तुकडे मंगळवारी दुपारी आढळले. या इमारतीमधील चेंबर चोकअप झाले तेव्हा रहिवाशांनी तक्र ार केली. चेंबर उघडले असता हा प्रकार समोर आला. एखाद्या फ्लॅटच्या टॉयलेटमधून मृतदेहाचे तुकडे टाकून फ्लश केले व ते तुकडे चेंबरमध्ये अडकले असावे असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला होता. चेंबर चोकअप झाल्यामुळे दुर्गंधी येऊ लागली होती.याबाबत उपविभागीय अधिकारी जयंत बजबळे यांनी बुधवारी संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन या हत्याकांडाचा शउलगडा करण्यात पोलिसांना यश आले असल्याचे सांगितले. हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव गणेश कोलटकर (५८) असून ते मीरा रोड येथे राहणारे होते. तो बेपत्ता असल्याची तक्र ार नयानगर पोलिस ठाण्यात त्यांच्या कुटूंबीयांकडून देण्यात आली होती. मुंबई-वाकोला, सांताकृझ येथे राहणाºया पिंटू शर्मा नामक व्यक्तिसोबत आर्थिक व्यवहारातून त्यांची हत्या करण्यात आली आहे.आरोपीने हत्या केल्यानंतर मृत शरीराचे काही भाग हॅक्सोब्लेडने कापून बाथरूमच्या ड्रेनेजमधून फ्लश केले होते.तर उर्वरीत भाग रेल्वे प्रवासादरम्यान व इतर ठिकाणी फेकून दिले होते. येथील ५० टक्के मानवी अवयव पोलिसांनी जप्त केले असल्याचे सांगितले. याबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी जयंत बजबळे यांनी आरोपीला अटक केली असून कलम ३०१,२०१ अन्वये गुन्हा दाखल केल्याचे सांगितले.>कोलटकरची टाळाटाळ; साठ हजारासाठी निघृण हत्याया इमारतीमध्ये ६०२ नंबरचा फ्लॅट आरोपी पिंटू शर्मा या शेअर दलालाने काही दिवसांपूर्वी भाड्याने घेतले होता. मयत गणेश कोलटकर (५८) याला पिंटू शर्मा याने एक लाख रूपये दिले होते. त्यापैकी चाळीस हजार रूपये गणेश कोल्हटकर याने पिंटू शर्मा याला दिले होते. उर्वरित साठ हजार देण्यासाठी तो कोलटकर याच्याकडे तगादा लावत होता. मात्र, कोलटकर याने आता मला लग्न करायचे आहे असे सांगून टाळटाळ केल्यामूळे या दोघांमध्ये बाचाबाची झाली असावी व त्यात कोलटकर याची हत्या केली असल्याचे तपासात समोर आले आहे.