शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
2
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
3
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
4
अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
5
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
6
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
7
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
9
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
10
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
11
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
12
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
13
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
14
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
15
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी
16
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
17
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
18
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
19
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
20
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले

प्रेयसीची हत्या करणारा तरुण अटकेत

By admin | Updated: August 19, 2016 02:00 IST

गोखीवरे येथील विद्याविकासिनी शाळेच्या आवारात सापडेलल्या तरूणीच्या हत्येचे गूढ उकलले असून वालीव पोलिसांनी दिल्ली येथून या तरूणीच्या प्रियकराला अटक केली आहे.

वसई : गोखीवरे येथील विद्याविकासिनी शाळेच्या आवारात सापडेलल्या तरूणीच्या हत्येचे गूढ उकलले असून वालीव पोलिसांनी दिल्ली येथून या तरूणीच्या प्रियकराला अटक केली आहे. आपल्या प्रेयसीचे दुसऱ्याशी प्रेमसंबंध असल्याने संतापलेल्या प्रियकराने तिची हत्या करून दिल्लीत पळ काढला होता. वसई पूर्वेच्या फादरवाडी येथे विद्या विकासिनी शाळेच्या मागील आवारातील मैदानात ३ जुलै रोजी एका तरूणीचा नग्नावस्थेत मृतदेह आढळून आला होता. गळा चिरून तिची हत्या केली होती. पालघर स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणात तपास करून मुलीची ओळख पटवली होती. हा मृतदेह वसईच्या बावशेतपाडा येथे राहणाऱ्या अंकिता टिकडे (१७) या मुलीचा असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. २६ जूनपासून अंकिता बेपत्ता होती. या घटनेनंतर अंकिताचा प्रियकर मनिष यादव (२२) हा फरार होता. वालीव पोलिसांनी मनिषच्या शोधासाठी जंगजंग पछाडले होते. तरीही त्याचा शोध लागला नव्हता. अशातच पोलिसांना मनिष वापरत असेलल्या एका मोबाईलचा आयएएमईआय क्रमांक सापडला. मनिषने त्याचा मोबाईल आपल्या मित्राला दिला होता. मित्राने तो मोबाईल भावाला दिला होता. त्यावरून पोलिसांनी चौकशी केली तेव्हा मनिष दिल्लीत असल्याचे समजले. वालीवच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक दिल्लीच्या कॅनॉट प्लेस येथे रवाना झाले. तेथील कल्पना हॉटेलध्ये सापळा लावून मनिषला अटक केली. वरिष्ठ पोलीस निरिक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने मनिषच्या मुसक्या आवळल्या. (प्रतिनिधी)मनिष आणि अंकिता यांचे दोन वर्षांपासून प्रेसंबंध होते. परंतु मनीषचा अंकितावर संशय होता. अंकिताचे मनीषच्या मित्रासवेत प्रेसंबंध सुरू असल्याचे त्याला समजल्याने तो संतापला होता. मनिषने २६ जून रोजी अंकिताला शाळेमागे भेटायला बोलावले. तेथे गळा चिरून हत्या केली. त्यानंतर तिच्मा मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी तिच्या अंगावरील सगळे कपडे काढले आणि माटुंग्याला मित्राकडे गेला. त्याच्या मदतीने मनिषने दिल्ली गाठले आणि हॉटेलध्ये काम करून राहू लागल्याची माहिती विभागीय पोलीस उपअधिक्षक अनिल आकडे यांनी दिली.