शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

येस बँक खातेधारकांमध्ये गोंधळाचे वातावरण, खातेधारकांची बँकेच्या शाखांवर सकाळपासूनच गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 00:49 IST

खाजगी क्षेत्रातील येस बँकेवर निर्बंध घातल्याने विरार पश्चिमेतील बँकेच्या शाखेवर शुक्रवार सकाळपासून खातेधारकांची गर्दी झाली होती. बँकेचे विविध व्यवहार ठप्प झाल्याने खातेधारकांना अनेक अडचणी आल्या.

विरार : रिझर्व्ह बँकेने गुरुवारी खाजगी क्षेत्रातील येस बँकेवर निर्बंध घातल्याने विरार पश्चिमेतील बँकेच्या शाखेवर शुक्रवार सकाळपासून खातेधारकांची गर्दी झाली होती. बँकेचे विविध व्यवहार ठप्प झाल्याने खातेधारकांना अनेक अडचणी आल्या.येस बँकेच्या खातेदारांना महिन्याला केवळ ५० हजार रुपयेच खात्यातून काढता येणार आहेत. हे निर्बंध तत्काळ लागू होत असल्याचे केंद्र सरकारने जाहीर करताच येस बँकेच्या खातेदारांचा गोंधळ उडाला. त्यामुळे शुक्रवारी सकाळपासून पश्चिमेच्या येस बँकेच्या विरार शाखेवर आणि एटीएमवर खातेधारकांनी धाव घेतली. बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मात्र वाढत्या गर्दीमुळे अवघ्या काही तासातच एटीएममधली सर्व रक्कम संपली. आणि त्यांनतर आलेल्या ग्राहकांची चांगलीच पंचाईत झाली. ५० हजार रुपयांपर्यंत रक्कम काढण्याची मुभा असल्याने सुरुवातीला काही रक्कम मिळाली होती. मात्र त्यानंतर ग्राहकांना टोकन देऊन दुसऱ्या दिवशी बँकेतून पैसे घेऊन जाण्याचे बँक कर्मचाºयाकडून सांगण्यात आले. दरम्यान, काही खातेदारांनी मोबाइल आणि इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातूनही पैसे ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न केला, मात्र या सेवा देखील डाऊन झाल्या होत्या. येस बँकेवर अचानक आलेल्या या निर्बंधांमुळे ग्राहकांचे अतोनात हाल झाले आहेत.>खातेधारकांना मनस्ताप : अनेकांना आपल्या महत्त्वपूर्ण कामांसाठी ठेवलेले पैसे काढता आले नाहीत. काहींना रुग्णालयात दाखल नातेवाईकांसाठी तर काहींना लग्नासाठी पैसे हवे होते. मात्र ते काढता आले नाहीत. यामुळे खातेधारकांना मोठा मनस्ताप सोसावा लागला. सद्यस्थितीत बँकेचे सर्व व्यवहार ठप्प असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.>बोईसरमध्येही खातेधारकांची गर्दीबोईसर : आरबीआयने येस बँकेच्या व्यवहारास स्थगिती दिल्याने असंख्य खातेधारकांची एकच धावपळ होऊन त्यांनी बोईसरच्या बँकेसमोर शुक्रवारी एकच गर्दी केली होती. बोईसर शाखेत छोटे-मोठे व्यापारी व कारखानदार आणि बांधकाम क्षेत्रातील काम करणाºया व्यावसायिकांचे तसेच अनेक खातेधारकांचे या बँकेत खाते असल्याने मोठे आर्थिक संकट कोसळून त्यांचे व्यवहार ठप्प होण्याची शक्यता आहे. कामगार व स्थानिक मजूर आपला पगार घेऊन उत्साहाने होळीचा सण साजरा करण्यासाठी घरी जाण्याची तयारीत असतानाच येस बँकेवरील बंदीमुळे त्यांचे पगार करण्यास कठीण झाले आहे. ही बंदी शिथिल करून बँकेचे व्यवहार करण्यास तूर्तास परवानगी द्यावी, तसेच सरकारने हस्तक्षेप करून खातेधारक, व्यावसायिकांची झालेली कोंडी दूर करावी, असे मत बांधकाम व्यावसायिक मनोज चुरी यांनी व्यक्त केले.