शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
2
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
3
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
4
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
5
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
6
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
7
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
8
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
9
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
10
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
11
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
12
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
13
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
14
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
15
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
16
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
17
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात
18
७१% चं रेकॉर्डब्रेकिंग इनक्रिमेंट! 'हे' आहेत भारतातील IT क्षेत्रातील सर्वाधिक कमाई करणारे CEO; मिळणार १५४ कोटी सॅलरी
19
४४ भूखंड, एक किलो सोने, २ किलो चांदी...! आरटीओ अधिकाऱ्याची संपत्ती एवढी की पाहून अधिकारी थक्क झाले...
20
वय वर्ष ८०, तरीही फिट! दिलीप प्रभावळकरांना स्वत:च्या फिटनेसचं आश्चर्य, म्हणाले- "एकदा ५ कुत्रे माझ्या लागले तेव्हा..."

होय, मी स्थलांतराचा ‘लाभार्थी’, रोजगार हमी फक्त कागदावर, उदरनिर्वाहाच्या शोधात पदरी कुपोषण, शैक्षणिक मागासलेपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 06:42 IST

होय मी लाभार्थी, हे माझे सरकार! अशी जाहिरात बाजी शासनाकडून सुरु असताना, होय मी स्थलांतराचा लाभार्थी अस काहीस म्हणायची वेळ आती दुर्गम आदिवासी बहुल मोखाद्यातील आदिवासींवर आली आहे.

- रविंद्र साळवेमोखाडा : होय मी लाभार्थी, हे माझे सरकार! अशी जाहिरात बाजी शासनाकडून सुरु असताना, होय मी स्थलांतराचा लाभार्थी अस काहीस म्हणायची वेळ आती दुर्गम आदिवासी बहुल मोखाद्यातील आदिवासींवर आली आहे. तालुक्यात रोजगार हमी योजनेची अमलबजावणी पूर्णता बासनात गुंडाळली गेली असल्याचं चित्र समोर आहे.१५ हजार १२७ नोंदणीकृत जॉबकार्ड धारक असताना शासनाकडून ७०० मजुरानाच रोजगार उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे मागेल त्याला काम आणि १५ दिवसात दाम या तत्वावर आधारलेला रोजगार हमी योजनेचा आलेख कोसळत असल्याची स्थिती आहे. या योजनेच्या अमलबजावणी चा कितीही डंका शासन पातळीवर वाजवला तरी वर्षनुवर्षे स्थलांतराच्या विळख्यातून आदिवासींची सुटका झालेली नाही हेच खरं!तालुक्यातील आदिवासी समाज बांधवाचा दिवाळी हा सण संपताच आपल्या कुटुंबानीशी स्थंलातरास सुरुवात होते. त्यांना आपले घर व गाव-पाडे, नातेवाईकांना सोडून भिवंडी, ठाणे, कुडुस, कल्याण, अंबाडी इत्यादी रोजगाराच्या शोधात भटकावे लागत आहे. त्यात अनेकदा त्यांची आर्थिक पिळवणूक होते. मोखाडा तालुका व गाव-पाडे दुर्गम व डोंगराळ भागात असल्याने नेहमीच शासनांच्या विकास योजनां पासून हा भाग उपेक्षित राहिला आहे.काही ठिकाणी कागदोपत्री विकास झाला आहे. त्यामुळे आपल्या मुलांबाळांच्या शिक्षणांची तमा न बाळगता पोटाची खळगी भरण्यासाठी विटभट्टी, इमारतींचे बांधकाम आदी कामात दिवसभर कडक उन्हा - तान्हात, रिकाम्या पोटा कडे न बघता अंगावरील घामाचे पाणी सारत काबाड-कष्ट करण्यांसाठी त्यांनी वर्षानुवर्ष पायपिट सुरु आहे.पावसाळा भर शेतात व हिवाळा, उन्हाळा भर पोटाची खळगी भरण्यासाठी कामाच्या शोधात भटकावे लागत असल्याने सण - उत्सवांच्या काळातील दिवस हे इतर दिवसांप्रमाणे येतात व जातात पंरतु कुटुंबाची आर्थिक, शैक्षणिक स्थिती सुुधारत नाही. आजही शासनांच्या दुर्लक्षित धोरणामुळे महागाईच्या काळात शंभर रुपये प्रतीदिन मजुरी मिळूनही आपला व आपल्या कुटूंबाचा रहाट गाडा कसा चालवायचा हा प्रश्न आहेच. शासनाने आदिवासी चे स्थंलातर थांबविण्यासाठी मनेरगा, रोजगार हमी, मजगी, घरकुल आदी योजना राबविल्या पण याही योजनांना सरकारी बाबु व ठरावीक लोकप्रतिनिधीची दृष्ट लागल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी लाकडाच्या मोळ्या, विटभट्टी, लहान मोठ्या इमारत बांधकामावर बिगारी म्हणूण काम करावे लागत आहे. त्यामुळे आज ही विकासाचे स्वप्न पाहणाºया राज्यामध्ये आदिवासीची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने आपल्या कुटुंबा बरोबर मुलां - मुलींना सुध्दा शिक्षणावर पाणी सोडून कुटुबांच्या पालन पोषणासाठी आई वडिलांना कामामध्ये मदत करावी लागत आहे. अशा आदिवासीच्या विकासाबाबत शासन उदासिन असल्यांने आज ही हजारो आदिवासी बांधवाना विटभट्टी, इमारतींचे बांधकामावर बिगारी म्हणूण काम करण्याशिवाय पर्याय नाही.यंत्रणेच्या वनविभाग ७ कामे, १३१ मजूर सां बा विभाग १ कामे मजूर १४०, सामाजिक वनीकरण ७ कामे मजूर ६ असे एकूण १५ कामे सुरु असून २७७ मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे.कृषी विभागांच्या कामाना अद्यापही मुहूर्त मिळालेला नाही त्याचबरोबर पंचायत समितीकडून बेरीस्ते, सातुर्ली, साखरी, आडोशी, पोशेरा, खोच, डोल्हारा अशा सात ग्रामपंचायतींमध्ये रस्ते व घरकुलांची २८ कामे सुरु असून ४२८ मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे.रोजगार हमीची कामे सुरु करण्या बाबत मी यंत्रणेच्या सर्व विभागाला पत्र दिली आहेत जास्तीच जास्त कामे सुरु करण्याबत वेळोवेळो मिटिंगा घेऊन सूचना दिल्या जाणार आहेतपी जी कोरडे -प्रभारी तहसीलदार मोखाडा

टॅग्स :Governmentसरकार