शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
4
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूवर सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
5
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
6
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
7
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
8
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
9
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
10
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
11
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
12
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
13
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
14
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
15
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
16
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
17
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
18
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
19
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
20
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार

जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 02:11 IST

जागतिक आदिवासी दिन गुरूवारी या जिल्ह्यात अपूर्व उत्साहात साजरा झाला.

पालघर : जागतिक आदिवासी दिन गुरूवारी या जिल्ह्यात अपूर्व उत्साहात साजरा झाला. आदिवासी एकता परिषदेच्या रॅलीस प्रचंड प्रतिसाद लाभला. बिरसा मुंडा चौक चार रस्ता ते पुढे जुन्या पालघरपासून हुतात्मा स्तंभावरून निघालेल्या रॅली मध्ये प्रचंड उत्साह ओथंबून वाहत होता. हुतात्म्यांना अभिवादन करून ही रॅली आर्यनच्या मैदानात पोचली.महिला, पुरुष, तरुण-तरुणी आपल्या पारंपरिक वेशात रॅलीत तारप्याच्या तालावर ठेका धरत होते. अग्रभागी बैलगाडी व त्यावरील नांगर, इरली, घोंगडे या चीजा सर्वाचे लक्ष वेधून घेत होत्या. या वर्षी स्थलांतर ही थीम निवडण्यात आली होती.या पाशर््वभूमीवर बुलेट ट्रेन, एक्सप्रेस वे नही चाहिये, नही चाहीये चे संतप्त नारे दिले जात होते. दीपक करबट, डॉ सुनिल पºहाड, कमलाकर अधिकारी, शशी सोनवणे, ठाकरे , बाळकृष्ण धोडी आदी सहभागी झाले होते.>जागतिक आदिवासी दिन नृत्याविष्काराने साजरातलासरी : आदिवासी समाज अज्ञानी, निरक्षर असेलही मात्र याच आदिवासींच्या संस्कृतीला निसर्गाचा आणि मातीचा सुगंध आहे. निसर्गाशी आदिवासी समाजाची नाळ जुळली आहे. त्यामुळे आदिवासी संस्कृतीवर निसर्गाचा मोठा प्रभाव दिसून येतो. दुर्गम, डोंगराळ व जंगलमय प्रदेशात वास्तव्य करणाऱ्या आदिवासी समाजाकडे लक्ष वेधण्यासाठी युनोने ९ आॅगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून पाळण्याचे जाहीर केले आहे. संपूर्ण देशासह आदिवासी बहुल पालघर जिल्ह्यात मोठ्या उत्साहात हा दिन साजरा करण्यात आला. तलासरी मध्ये ही आदिवासींनी तारपामधून निघणाºया सुरांवर आणि तूर थाळीच्या तालावर ठेका धरून नृत्य केले व त्यांच्या सांस्कृतिक आणि आदिवासी कला आविष्कारांचे दर्शन घडविले. तलासरी तालुक्यातील कॉ.गोदावरी परु ळेकर कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय, नथु ओझरे महाविद्यालय, शासकीय वसतिगृह, बहुउद्देशीय ज्ञान साधना माध्यमिक शाळा इत्यादीतील हजारो विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा परिधान करून थाटामाटात मिरवणूक काढली. एकमेंकांच्या हातात हात गुंफलेले, तूरथाळीचा गजर, लोकगीते यामध्ये तल्लीन झालेल्या विद्यार्थ्यांनी संस्कृतीचे सुरेख दर्शन घडविले. यावेळी मुख्य बाजारपेठ ही ‘जय आदिवासी’’, बिरसा मुंडा की जय’’ अशा घोषणांनी दुमदुमली होती. महाविद्यालयीन तरु ण तरुणींचे विविध गट टप्याटप्यावर तालबध्द आणि मनमोहक कला अविष्कारांचे मनमोहक सादरीकरण करीत होते.>वाडा येथे निघाली पारंपारीक भव्य शोभायात्रावाडा : आज येथे भव्य शोभायात्रा काढण्यात आली. तीमध्ये हजारो विद्यार्थी-विद्यार्थिनींसह आदिवासी बांधवांनी सहभागी होऊन आदिम संस्कृतीचे दर्शन घडविले. आदिवासी समाजातील अनेक तरु णांनी आपल्या समृद्ध संस्कृतीचा अविष्कार सादर केला. तारपा नृत्य, ढोल नृत्य, पारंपरिक वाद्य वादनासह सादर झाले. त्यावर ठेका धरणारे पारंपांरीक वेशभूषेतील तरु ण हे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. आदिवासी वाद्यांच्या निनादाने वाडा शहर दुमदुमून गेले होते. खण्डेश्वरी नाका येथून निघलेली ही शोभा यात्रा संपूर्ण शहरात फिरली. नंतर पंचायत समिती येथील हुतात्मा चौकाजवळ बिरसा मुंडा यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. पुढे पांडुरंग जावजी हायस्कूल येथे अनेक मान्यवरांनी तिच्यापुढे प्रबोधनात्मक भाषणे केली. मातृभूमी संघटना,महाराष्ट्र राज्य आदिवासी शिक्षक संघटना, आदिवासी युवा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. यात सर्वच राजकीय पक्ष व सामाजिक संस्थाचे पदाधिकारी सहभागी झाले होते. कुडूस येथील आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थीनींनी कुडूस गावात प्रबोधनात्मक फेरीकाढली. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयातील सभागृहात विविध पारंपारिक वेशभूषेत गाणी गाऊन आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविले. या सर्व कार्यक्रमांना जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने सहभागी मंडळींचा उत्साह वाढला होता.>विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटपमोखाडा :ङ्क्तभार्इंदर येथील शंकर नारायण महाविद्यालय व शिवछत्रपती समाज सेवा मंडळ जुचंद्र वसई तर्फे आदिवासी दिनानिमित्त या भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष तथा मिरा भार्इंदर मनपा सभागृह नेता रोहिदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोखाडा तालुक्यातील आदिवासी आश्रमशाळा म्होरांडा, आश्रम शाळा पोशेरा, म. विठ्ठल रामजी शिंदे आश्रम शाळा मोखाडा व महात्मा फुले आश्रम शाळा आशे येथील विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पुस्तके, मोठे फलक व अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. जुचंद्र येथील समाजसेवक पुरु षोत्तम पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवछत्रपती समाजसेवक मंडळ जुचंद्र यांच्या वतीने व शंकर नारायण महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी आदिवासी विभागातील विद्यार्थ्यांना विविध उपक्र मांद्वारे सर्वतोपरी मदत करण्याचेठरले आहे. विद्यार्थ्यांंच्या सर्वांगीण विकासासाठी शालेय साहित्यबरोबरच क्र ीडासाहित्य व पुस्तक पेढी योजना या विशेष उपक्र माचे आयोजन करण्यात आले. इयत्ता ८ वी, ९ वी, १० वी च्या विद्यार्थ्यांना वर्षभरासाठी या योजनेअंतर्गत पुस्तक संच वाटप करण्यात आले. शंकर नारायण महाविद्यालयाचे ग्रंथपाल संदेश डोंगरे व इंग्रजी विभागप्रमुख डॉ. धीरज चौहान यांनी महाविद्यालयाच्यावतीने यांनी विशेष परिश्रमघेतले. जुचंद्र येथील कैलास म्हात्रे यांनी महात्मा फुले आश्रम शाळा आशे या विद्यालयास २००० वह्या भेट दिल्यातसेच रयत संस्थेचे आदिवासी शाळा म्होरांडा या विद्यालयास लाईट, पंखे आदी भेटदिली.>मनोर परिसरात विविध कार्यक्र ममनोर : जागतिक आदिवासी दिन मनोर परिसरात आदिवासी बांधवांनी पारंपरिक वेशभूषेत तसेच वाजत गाजत मनोर गावात, खेडो पाड्यात मोठ्या उत्साहत साजरा केला त्या वेळी संतोष जनाठे सरचिटणीस भाजपा यांनी आपला पारंपरिक आदिवासी वेश घातला होता तर श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित मोटर सायकल रॅलीत सहभागी झाले होते. तसेच चिल्हार फाटा मित्र मंडळातर्फे मनोर येथे बिरसा मुंडा चौक ते मनोर गावापर्यंत मिरवणूक काढण्यात आली होती त्या मध्ये पिंपरी ढोल नृत्य सादर करण्यात आले.पारंपरिक वेशभूषा करून हातात कुºहाड, कोयता, मलाई, पागेर, टोपली अशा वस्तू हातात घेऊन व नृत्य करून आदिवासींनी हा दिन म्हणजे सण साजरा केला या वेळी त्यांना इतर समाजाच्या बांधवांनी शुभेच्छा दिल्यात. श्रमजीवीतर्फे मोटर सायकल रॅली काढण्यात आली.>जव्हारमध्ये निघाली मिरवणूकजव्हार : जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हार शहरात मिरवणूक काढून मोठ्या उत्साहात जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला. तसेच गावागावात आणि आश्रमशाळा, आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, अन्य गावांत ठिकठिकाणी भव्य कार्यक्र मांचे आयोजन करून पारंपारिक वेशभूषेत मिरवणूक काढण्यात आली. तारपा नाच, ढोलनाच, सांबळ नाच, तुरनाच, गरबा नाच, मादोळ नाच, सादर करण्यात आले.>जव्हार शहरात हनुमान पॉर्इंट, मांगेलवाडा, अंबिकाचौक, गांधीचौक, तारपाचौक, पाचबत्ती नाका, यशवंतनगर मोर्चा, येथून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या वेळी आदिवासी आघाडी अध्यक्ष हरीचंद्र भोये, जि. प. सदस्य रतन बुधर, जि.प. सदस्य सुरेखा थेतले, प.स.सदस्य ज्योती भोये, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष कमळाकर धूम, उपसभापती सीताराम पागी, विनायक राऊत, युवा अध्यक्ष महेश भोये, सचिव तुळशीराम चौधरी, नरेश मुकणे, मनोज कांमडी, आदी उपस्थित होते.>तारपानृत्याच्या आविष्काराने आदिवासी दिन साजराबोर्डी : जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील गाव-पाड्यात पारंपरिक वेशभूषा केलेल्या आदिवासी बांधवांनी तारपा या पारंपरिक नृत्याविष्काराचे सादरीकरण करून हा दिन साजरा केला. विविध गावातील रॅली सागरनाका येथील बिरसा मुंडा चौकात एकत्र आल्या. सामूहिक पूजनानंतर हा समूह पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाला. सकाळपासून चौका-चौकात सांस्कृतिक कार्यक्र माचे आयोजन होते. तर सकाळी साडेसातच्या सुमारास डहाणू सागरनाक येथील बिरसा मुंडा तारपा चौकात मशाल पेटवून आदिवासी क्र ांतिवीर बिरसा मुंडा, तंट्या भिल, राघोजी भांगरे यांना अभिवादन करून तारपकरीला(तारपा वादक) पुष्पहार घालण्यात आला.