शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

कोविडच्या बंदिशाळेतून लवकरच जगाची सुटका व्हावी; शांततामय क्रांतीचा आग्रह धरावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 22:58 IST

कोविडच्या या बंदिशाळेतून नवीन वर्षात जगाची सुटका व्हावी, हीच अपेक्षा असल्याचे मत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केले.

आशीष राणेवसई : जग आपल्या गतीने, आपल्या पद्धतीने आणि किंबहुना आपल्या मस्तीने चालले असताना अचानक कोविड-१९ महामारीने जगाला खिंडीमध्ये पकडले, हे चिंताजनक आहे. आज जगाची अवस्था बंदिशाळेसारखी झालेली आहे. कोविडच्या या बंदिशाळेतून नवीन वर्षात जगाची सुटका व्हावी, हीच अपेक्षा असल्याचे मत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केले.

फादर दिब्रिटो म्हणाले की, माझ्या प्रिय देशवासीय मित्रांनो, एका अर्थाने गेली तीनचार दशके आपण या साथीची जणू तयारी करीत होतो की काय, असेच वाटायला लागले आहे. कोविड-१९ चे संकट विनाशकारी आहे. ज्या पद्धतीने जल, जंगल आणि जमीन यांचे शोषण होत आहेत, पर्यावरणाचा विनाश होत आहे, त्या अर्थाने कुठल्या तरी महान संकटाची आपण सर्वजण तयारी करीत होतो, हे सांगण्यासाठी ग्रेटा थुलबर्ग नावाची एक चिमुरडी मुलगी जगाच्या व्यासपीठावर आली.  आज प्रत्येक राष्ट्र हे दुसऱ्या राष्ट्रापेक्षा शक्तिशाली किंबहुना मोठे होण्याचा प्रयत्न करत आहे. मिलिटरी, लष्कर वाढवले जातेय, तर युद्धनौका व युद्धासाठी लागणारी विमाने याची खरेदी होत आहे.

कशासाठी हे सर्व? जणू माणसाला माणूस आपला शत्रू वाटू लागला आहे. समोरची व्यक्ती माझा मित्र नाही तर माझे भक्ष्य आहे, शिकार आहे, त्यादृष्टीने राष्ट्रे एकमेकांकडे पाहत आहेत आणि म्हणूनच आपल्याला हे सर्व होत असताना चिंतन करणे आवश्यक आहे. कोविडमध्ये गरिबांचे शोषण झाले. या महामारीच्या वेळी सगळ्यात जास्त शोषण झालेला वर्ग म्हणजे गरीबवर्ग, ज्यांच्याकडे काहीही नाही आहे. स्थलांतरितांचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर निर्माण झाला. या महामारीमुळे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. आपण स्थलांतरितांचा प्रश्न पाहिला, अगदी मुक्या जनावरांप्रमाणे ते रस्त्यावरून चालत होते. त्यांना कुणी वाली उरलेला नव्हता. शासनदेखील तोकडे पडले व आपली सर्व व्यवस्था पांगळी झाली, असे ते म्हणाले. 

टॅग्स :New Yearनववर्षVasai Virarवसई विरार