शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

नालेसफाईसाठी महिलांना जुंपल्याने श्रमजीवीची महापालिकेत उपायुक्तांविरुद्ध निदर्शने 

By धीरज परब | Updated: December 17, 2023 16:23 IST

पालिका उपायुक्त रवी पवार यांनी नाले सफाईच्या कामाला ठेक्यावरील महिलांना जुंपले असता महिलांनी नालेसफाईच्या कामास नकार दिला .

मीरारोड - पालिकेने दैनंदिन नालेसफाईच्या कामास महिलांना जुंपले म्हणून राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग सदस्य यांच्या दौऱ्या वेळी पालिका उपायुक्त यांच्यावर कारवाईची मागणी करत श्रमजीवी संघटनेने निदर्शने केली. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगचे सदस्य सुभाष पारधी यांनी शनिवारी १६ डिसेम्बर रोजी मीरा भाईंदर महापालिका मुख्यालयात येऊन अनुसूचित जाती जमातीतील कामगारांच्या समस्या, योजना आदींचा आढावा घेतला. माजी खासदार  संजीव नाईक, अतिरिक्त आयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, उपायुक्त संजय शिंदे व कल्पिता पिंपळे, शहर अभियंता दिपक खांबीत, पारधी यांचे सचिव नवीन रोहिला,  विभागप्रमुख तसेच व विविध संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.  

महानगरपालिका आस्थापनेत अनुसूचित जाती जमाती कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या आरक्षण, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना अंतर्गत महानगरपालिकेने काँक्रिट रस्ता, गटार बांधणे, नाल्यावरील स्लॅब टाकणे, रंगमंच बांधकाम इत्यादी कामे करण्यात येणार असल्या बद्दल माहिती सादर केली. यावेळी पारधी यांनी पालिकेने केलेल्या कामाचा सविस्तर अहवाल येत्या ३० दिवसात देण्याची सूचना केली. तर श्रमजीवी कामगार संघटनेच्या वतीने कार्याध्यक्ष सुलतान पटेल यांनी पारधी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. 

डॉ. बाबासाहेब श्रमसाफल्य घरकुल योजने अंतर्गत २१२ पात्र सफाई कामगार पैकी १५० कामगार हे अनुसूचित जाती जमातीतील असून ७ वर्षांपासून सदनिका मिळालेल्या नाहीत. पंतप्रधान आवास योजना, बीएसयुपी, झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत १५ टक्के घरे सफाई कामगारांना देण्याचे शासन आदेश असून देखील दिली गेली नाहीत. पालिकेच्या अर्थसंकल्पापैकी १ टक्का रकमेतून सफाई कामगारांना घरे बांधून मिळावीत. वारसा हक्क व अनुकंपाचा लाभ मिळावा म्हणून लाड-पांगे समितीच्या शिफारशी पालिका लागू करत नाही आदी मुद्दे पटेल यांनी पारधी यांच्या कडे मांडत सफाई कामगारांना त्यांचा न्यायिक हक्क देण्याची मागणी केली.  

दरम्यान पालिका उपायुक्त रवी पवार यांनी नाले सफाईच्या कामाला ठेक्यावरील महिलांना जुंपले असता महिलांनी नालेसफाईच्या कामास नकार दिला . तर नेहमीचे काम करून सुद्धा महिलांचा दिवस न भरता खाडा मारण्यात आल्याने पवार यांच्यावर गुन्हा दाखल करून निलंबित करा अशी मागणी श्रमजीवी कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष सुलतान पटेल यांनी पारधी यांच्या कडे केली. यावेळी संघटनेचे ठाणे उपाध्यक्ष मंगेश पाटील , मीरा भाईंदर अध्यक्ष मंगेश मोरे, सरचिटणीस इरफान शेख, उपाध्यक्ष जयश्री पाटील व महेश पाटील यांनी लेखी तक्रार पारधी यांच्या कडे दिली. श्रमजीवी संघटनेच्या महिला कार्यकर्त्यांनी यावेळी पालिकेत पवार यांच्या विरुद्ध घोषणाबाजी करत निषेध केला . पवार यांच्यावर कारवाई झाली नाही तर संस्थापक अध्यक्ष विवेकभाऊ पंडित यांच्या मार्गदर्शना नुसार सोमवार पासून आंदोलनाची दिशा ठरवली जाईल. पालिकेत उपायुक्त पवार बसतातच कसे? हे बघू असा इशारा पटेल यांनी दिला. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारmira roadमीरा रोड