शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरच्या कामगार रूग्णालयाची पुनर्बांधणी रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 23:27 IST

वर्षभरापूर्वी झाले होते भूमिपूजन

सदानंद नाईक ।लोकमत न्यूज नेटवर्कउल्हासनगर : येथील कामगार रूग्णालयाच्या पुनर्बांधणीचे भूमिपूजन वर्षापूर्वी मोठा गाजावाजा करत झाले. पण अद्याप कामाला सुरूवातही झालेली नसून हे रूग्णालय सध्या धोकादायक इमारतीमध्येच सुरू आहे. येत्या पावसाळ््यापूर्वी पवई चौकातील एका खाजगी जागेत रूग्णालय स्थलांतरीत केले जाणार आहे. शस्त्रक्रिया सोडून सर्व उपचार केले जाणार असल्याची माहिती रूग्णालयाचे अधीक्षक डॉ. विलास डोंगरे यांनी दिली. तीन वर्षात १२० च्या निधीतून १०० बेडचे आधुनिक रुग्णालय बांधले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

उल्हासनगर कॅम्प नं-३ येथे कामगार रूग्णालय असून हजारो कामगार येथे तसेच कुटुंबातील सदस्यांसाठी उचारासाठी येत असतात. त्यांच्यावर विनामूल्य उपचार केले जातात. ठाणे जिल्ह्यात फक्त दोनच कामगार रूग्णालय असून दोन्ही रूग्णालयांना अवकळा आली आहे. रूग्णालयाची इमारत धोकादायक झाल्याने ५ वर्षापूर्वी शस्त्रक्रीया विभाग बंद करण्यात आला. खाजगी रूग्णालयात शस्त्रक्रियेसह प्रसूती तेथे केली जाते. रूग्णालयाच्या पुनर्बांधणीचा प्रश्न खासदार श्रीकांत शिंदे यांनी पाच वर्षापूर्वी लावून धरल्यावर दोन वर्षापूर्वीच पुनर्बांधणीला मंजुरी मिळाली. लोकसभा निवडणुकीपूर्वी १२० कोटींच्या निधीतून उभारण्यात येणाऱ्या रूग्णालयाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम खासदार शिंदे यांच्या हस्ते झाला होता.

इमारतीच्या पुनर्बांधणीपूर्वी रूग्णालय खाजगी जागेत हलविणे गरजेचे आहे. कॅम्प नं-३ पवई चौकातील एका खाजगी जागेत कामगार रूग्णालय स्थलांतरीत करण्यात येणार असून तेथे बाह्यरूग्ण विभाग सुरू राहणार आहे. रूग्णावर उपचार, शस्त्रक्रिया व इतर कामे खाजगी रूग्णालयाकडून करण्यात येणार असून त्यांचा सर्व खर्च राष्ट्रीय कामगार विमा सोसायटीच्या वतीने केला जाणार असल्याचे डॉ. डोंगरे यांनी सांगितले. पावसाळयापूर्वी रूग्णालय खाजगी जागेत स्थलांतरीत केले नाहीतर, रूग्णालय बंद करण्याचे संकेतही त्यांनी दिले. धोकादायक झालेल्या रूग्णालयाच्या इमारतीत डॉक्टरांसह १५० जणांचा कामगार वर्ग तसेच रूग्ण व त्यांच्या सोबत असलेले नातेवाईक जीव मुठीत घेऊन राहतात. सरकारकडे पाठपुरावा होत नसल्याने भूमिपूजनाला एक वर्ष उलटून कामाला सुरूवात झाली नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.३२ रूग्णांसाठी १५० डॉक्टर१०० खाटाच्या कामगार रूग्णालयात फक्त ३२ रूग्ण उपचार घेत असून बाह्यरूग्ण विभागात १०० पेक्षा जास्त रूग्णांची नोंद आहे. धोकादायक इमारत झाल्याने, रूग्ण येथे उपचार करण्यासाठी येत नसून रूग्णांपेक्षा डॉक्टर व कर्मचाऱ्यांची संख्या अधिक आहे.