शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

वनक्षेत्रपालाविरोधात श्रमजीवीचा मोर्चा

By admin | Updated: March 9, 2017 02:12 IST

वनजमिनीवर होणाऱ्या अतिक्रमणावर कारवाई करण्याऐवजी त्यांना अभय देऊन संघटनेच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केलेल्या वनक्षेत्रपालाविरोधात श्रमजीवी

वसई : वनजमिनीवर होणाऱ्या अतिक्रमणावर कारवाई करण्याऐवजी त्यांना अभय देऊन संघटनेच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केलेल्या वनक्षेत्रपालाविरोधात श्रमजीवी संघटनेने गोखीवरे रेंज आॅफिसवर मंगळवारी मोर्चा नेला होता. यावेळी खोटे गुन्हे मागे घेतले जातील आणि वनखात्याच्या जागेवर झालेले अतिक्रमण दूर केले जाईल, अशी ग्वाही दिल्यानंतर मोर्चा संपवण्यात आला. वसई तालुक्यात वन विभागाच्या आणि आदिवासींच्या जागा हडप करून त्याठिकाणी मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे करण्यात आली आहेत. याप्रकरणी वनक्षेत्रपाल दिलीप तोंडे कोणतीच कारवाई करीत नाहीत. उलट याप्रकरणी तक्रार करणाऱ्या श्रमजीवी संघटनेच्या आत्माराम ठाकरे यांच्यासह काही कार्यकर्त्यां विरोधात तोंडे यांनी खोट्या तक्रारी केल्याचा आरोप करीत श्रमजीवी संघटनेच्या वतीने मंगळवारी वसईतील गोखीवरे येथील रेंज आॅफिसवर मोर्चा नेण्यात आला होता. संघटनेचे उपाध्यक्ष रामभाऊ वारणा, सुरेश रेंजड, आत्माराम ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चात आदिवासी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तोंडे यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली. शेवटी वनखात्याचे वरिष्ठ अधिकारी आणि वालीव पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी मोर्चेकऱ्यांशी बोलणी करून तोडगा काढला. श्रमजीवीचे ठाकरे आणि कार्यकर्त्यांविरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात येतील. वनखात्याच्या जागेवर झालेल्या अतिक्रमणाविरोधात कारवाई केली जाईल, अशी ग्वाही दिल्यानंतर मोर्चा समाप्त करण्यात आला. (प्रतिनिधी)