शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

‘भाभा’ तील कामगाराचा हात निकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2022 08:39 IST

बीएआरसीच्या  प्लांटमध्ये अणू इंधनाची पुनर्प्रक्रिया करणाऱ्या इंटिग्रेटेड न्यूक्लिअर रिसायकल प्लांट (आयएनआरपी) च्या उभारणीचे काम सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कबोईसर : तारापूर येथील भाभा अणू संशोधन केंद्रामध्ये (बीएआरसी)  शनिवारी झालेल्या अपघातात एका कंत्राटी कामगाराचा उजवा हात मशीनमध्ये अडकून निकामी झाला आहे. त्याच्यावर बोईसर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या गंभीर घटनेसंदर्भात तारापूर पोलीस ठाण्यात सोमवारी संध्याकाळपर्यंत कळविले नव्हते. 

बीएआरसीच्या  प्लांटमध्ये अणू इंधनाची पुनर्प्रक्रिया करणाऱ्या इंटिग्रेटेड न्यूक्लिअर रिसायकल प्लांट (आयएनआरपी) च्या उभारणीचे काम सुरू असून डहाणू येथील राजू खिरारी (३६) हा कंत्राटी कामगार टाटा प्रोजेक्ट कंपनीच्या अंतर्गत असलेल्या अन्य कंत्राटदाराद्वारे काँक्रिटीकरणाचे काम करीत होता. ५ मार्च रोजी सकाळी ११ च्या दरम्यान सिमेंटच्या गोणीमध्ये हात अडकून यंत्रात खेचला गेल्याने उजव्या हाताच्या कोपऱ्यापासून ५ ते ६ इंचांपुढे  पंज्यापर्यंतचा भाग चिरडला गेल्याचे समजते. त्याला  रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तळहात  वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र गंभीर दुखापतीमुळे तळहातापासूनचा  पुढील काही भागापर्यंतचा हात कापावा लागला. या घटनेचा तारापूर पोलिसांकडून तपास होईल तेव्हा निश्चित माहिती समोर येईल. यापूर्वीही अपघात झाल्याचे दबक्या आवाजात बोलले जात आहे.

बीएआरसीमध्ये शनिवारी झालेल्या अपघाताची माहिती तारापूर पोलीस ठाण्यात सोमवारी संध्याकाळपर्यंत कळविलेली नव्हती. - योगेश जाधव, साहाय्यक पोलीस निरीक्षक, तारापूर पोलीस ठाणे