शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रा.पं.कर्मचाऱ्यांचे काम पालघर जिल्ह्यात बंद

By admin | Updated: July 14, 2016 01:34 IST

या जिल्हयातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यासांठी बुधवारी आठ तालुक्यातील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करून जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा नेला होता.

पालघर : या जिल्हयातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यासांठी बुधवारी आठ तालुक्यातील कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन करून जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा नेला होता.महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संतोष मराठे यांच्या नेतृत्वाखाली आज शेकडो कर्मचाऱ्यांनी पालघरच्या जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा नेला. यावेळी पालघर तालुक्याचे दीपक मोरे, वाडयाचे मुकेश गायकवाड, तलासरीचे जितेंद्र वरठा, वसईचे दर्शन वर्तक, मोखाडयाचे भगत, विक्र्रमगडचे नाईक, डहाणूचे छोटू मराठे हे उपस्थित होते. या मोर्चाला बविआचे तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील, रिपाईचे सुरेश जाधव, सेनेचे जगदीश धोडी, सचीन लोखंडे इ. नी आपला पाठिंबा जाहीर केला.कर्मचारी संघटनेच्या अनेक मागण्या शासन दरबारी प्रलंबित असून कर्मचाऱ्यांना किमान वेतनपेक्षाही कमी वेतन मिळले असून ५० टक्यापेक्षाही जास्त ग्रामपंचायतीमधील कर्मचाऱ्यांवर वेतनही वेळेवर मिळत नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिती अत्यंत दयनीय आहे. या संदर्भात न्यायालयाने निर्देश देउनही कार्यवाही होन नसल्याचे यावेळी सांगण्यात आले. जिल्हा परिषदेच्या चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांना ज्या शर्तीवर नैमित्तिक रजा दिली जाते. तेवढीच रजा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना देण्याची तरतूद असताना ती दिली जात नाही. प्रत्येक कर्मचाऱ्यांचे प्रपत्र भरणे आवश्यक असताना ते भरले जात नाही. तसेच कर्मचारी वर्गाचे सेवा पुस्तक भरून ते अद्ययावत केले जात नाही. तसेच भविष्य निर्वाह निधीच्या रक्कमेचा भरणा केला जात नाही. इ. बाबत मुख्यकार्यकारी अधिकारी निधी चौधरी व उपमुख्यकार्यकारी अधिकारी चव्हाण यांच्याशी चर्चा झाली. यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाबरोबर जिल्हापरिषद व गटविकास अधिकाऱ्यांनी कॅलेंडर वर्षात घ्यावयाच्या सभाबाबत प्रतिसाद दिला जाईल. आकृतीबंधाप्रमाणे वेतन देणे कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्याबाबत जिल्हापरिषद प्रशासन सकारत्मक निर्णय घेईल असे निधी चौधरी यांनी या दरम्यान सांगितले. (वार्ताहर)