शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

व्होटर स्लीपवर पुरुषांच्या जागी महिला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 23:17 IST

पुरुषांचे नाव असलेल्या स्लीपवर महिलेचा तर महिलेचे नांव असलेल्या स्लीपवर पुरुषाचा फोटो असा निवडणुक आयोगाचा अजब कारभार समोर आला आहे.

राहुल वाडेकर 

विक्रमगड : राज्य निवडणुक आयोगाच्या सार्वत्रिक निवडणुकीत पालघर लोकसभेकरीता निवडणूक आयोगाकडून देण्यांत येणाऱ्या मतदान चिठ्ठयांवर (व्होटर स्लीप) पुरुषांचे नाव असलेल्या स्लीपवर महिलेचा तर महिलेचे नांव असलेल्या स्लीपवर पुरुषाचा फोंटो असा निवडणुक आयोगाचा अजब कारभार समोर आला आहे. तर या स्लीप वाटप करणाऱ्या बिएलओंना या चुकांमुळे त्रास सहन करावा लागत आहे.

शहरातील जुनी बाजारपेठे येथील रहिवासी भास्कर बाळकृष्ण मुळे व अतुल विलास वाडेकर यांचे व्होटर स्लीपर महिलेंचा फोटो छापण्यात आला आहे़ तर शालीनी बाळकृष्ण मुळे यांच्या व्होटर स्लीपवर पुरुषाचा फोटो छापला आहे़ विक्रमगडमध्ये बुधवारपासून बिएलओ यानी व्होटर स्लीप वाटण्यासाठी सुरुवात केली़ परंतु बुधवारी स्लीप वाटपा दरम्यान त्यांना लक्षात आले की, काही स्लीपवर इमारतींची नावेच छापलेली नाहीत. अनेक स्लीपवर तर सदनिका क्रमांक नाही, काही त्या ठिकाणी राहातच नाहीत अशा अनेक समस्या आहेत़ आणखीही काही समस्या समोर येवु शकतात. त्यामुळे बिएलओ कर्मचाऱ्यांना व्होटर स्लिप वाटतांना मोठा त्रास होत आहे.

हे कर्मचारी भर उन्हामध्ये या मतदान चिठ्ठ्यांचे वाटप करत आहेत़ मात्र, विहित पत्त्यावर गेल्यावर समजते की, स्लीपवरील व्यक्ती तेथे राहात नाहीत किंवा त्यांच्या नावामध्ये काही तरी चुकीचे छापले आहे़ या समस्या समोर येत असल्याने त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे़ मतदारही गोंधळलेले आहेत.

आयोगाच्या उद्देशाला तांत्रिक चुकांमुळे हरताळनिवडणुक आयोगाकडुन या वर्षी मतदान चिठ्ठीमध्ये थोडाफार नवीन बदल केले आहेत. जेणे करुन लोकाना सर्व माहिती छापलेली चिठ्ठी मिळावी. या उद्देशाने यावेळी आयोगाने मतदाराचे नांव छायाचित्र मतदान केंंद्र कमांक, मतदान यादी भाग क्रमांक मतदानाची वेळ अशी पूर्ण माहिती असलेली चिठ्ठी छापून देण्यास सुरुवात केली आहे़े. स्लीप वाटपा दरम्यान त्यांना लक्षात आले की, काही स्लीपवर इमारतींची नावेच छापलेली नाहीत. अनेक स्लीपवर तर सदनिका क्रमांक नाही, काही त्या ठिकाणी राहातच नाही.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकpalghar-pcपालघर